Vanchit News

विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गट व विद्यार्थी गटाची लक्षवेधी उपकरणे.तहसिलदार व गटशिक्षणाधिकार्‍यांकडुन पाहणी.वंचित न्यूज चॅनल : सहसंपादक:- श्रीरंग कांबळे. दिनांक:- 19/1/2023 कोल्हापूर/राधानगरी:- तालुकास्तरीय ५० व्या विज्ञान प्रदर्शनाचे बुधवार, दि. १८ ते शुक्रवार, दि. २० जानेवारी या कालावधीत गुडाळ येथे ‘डॉ. कमला सोहोनी विज्ञान नगरी च्या प्रांगणात आयोजन केले आहे. पं.स.राधानगरी शिक्षण विभाग आयोजित, केंद्रशाळा गुडाळ व गुडाळेश्वर हायस्कुल हे संयोजक आहेत. ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ हा विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे. श्री गुडाळेश्वर हाय. गुडाळ शाळेच्या सहायक शिक्षिका मेघा सागर बरगे यांनी भौतिक शास्त्र व जीवशास्त्र मधील अभिरुची विद्यार्थ्यांमध्ये कशी वाढवता येईल यासाठी त्यांनी बनवलेले विद्युत चलित्र, वायरलेस एनर्जी, पेशी नमुने खास आकर्षक ठरले. राधानगरी तहसीलदार सौ मीना निंबाळकर, गटशिक्षणाधिकारी बी.एम.कासार यांनी त्यांच्या उपकरणाची पाहणी केली. कौलव हायस्कूल कौलव चे सहाय्यक शिक्षक अमोल महादेव लाड यांनी सध्याची शेतकऱ्यांची स्थिती पाहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांसाठी ऊस भरणी यंत्र बनवले आहे. अलीकडच्या काळात मजुरांची टंचाई भासत असल्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये आणि ऊस भरणीच्या कामात मजुरांच्या टंचाईचा त्रास कमी करण्यासाठी हे यंत्र बनवले आहे. या यंत्रामुळे वेळेची बचत होते. सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये ऊस भरणे सहज शक्य होते ,ऊस भरताना होणारे अपघात टाळता येतात आणखी बरीच वैशिष्ट्ये या उपकरणाची आहेत. राधानगरी तहसीलदार सौ मीना निंबाळकर ,गटशिक्षण अधिकारी बी एम कासार व शिक्षण विस्तार अधिकारी ए. वाय. पाटील यांनी उपकरणाची पाहणी केली. प्राथमिक शिक्षक गटात केंद्रशाळा दुर्गमानवड या शाळेचे अध्यापक श्री. अजित रघुनाथ सुतार यांचे ‘माझी शाळा’ हे उपकरण आकर्षनाचा केंद्रबिंदु ठरले,या साधनातून त्यांनी संख्याज्ञान,मानवी शरीर, अन्ननलिका, ठिबक सिंचन, दशमान परिमाणे, नाकाशवाचन,वर्तुळ असे १७ घटक सादरीकरण केले,त्यांच्या या साधनाला राधानगरी तहसीलदार सौ.मीना निंबाळकर, गटशिक्षणाधिकारी बी एम कासार यांनी भेट देऊन उपकरणाची पाहणी केली. किसनराव मोरे हाय. सरवडेचा विद्यार्थी सुहास रब्बे याने एक उपकरण सादर केले आहे. आजच्या काळात ज्यादातर लोक चारचाकी गाडीचा वापर करतात. त्याचबरोबर सार्वजनिक गाडीचा वापर करतात. किती तरी गाड्या ह्या 10-20 तासांचा प्रवास करतात . खुप प्रवास केल्या मुळे कधी कधी ते टायर गरम होतात. इतके गरम होतात की ते टायर फुटतात. यातुन एक मोठा अपघात होतो. या अपघाताला आळा घालण्यासाठी त्याने वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपकरण तयार केले आहे त्याचं नाव ‘टायर ब्लास्टिंग इंडीकेटर ‘ . या मध्ये एक ‘ थरमल सेन्सनचा ‘वापर केला आहे. जेव्हा गाडी प्रवास करून टायर खुप गरम होतात त्यावेळी या सेन्सरला जोडलेला ‘बझर’ आवाज देईल व चालकाच्या लक्षात येईल की आपल्या गाडीचा टायर खुप गरम झाला आहे. त्यामुळे आपल्याला गाडी थांबवावी लागेल. या मुळे होणारा अपघात हा टाळला जाऊ शकतो. राधानगरी तहसीलदार सौ मीना निंबाळकर, गटशिक्षणाधिकारी बी.एम.कासार यांनी त्याच्या उपकरणाची पाहणी केली.


Vanchit News