Vanchit News

लाखो लोकांना जीवदान देणाऱ्या देवदूत डॉ.संजय देसाई यांचा मातोश्री वृद्धाश्रम मध्ये वाढदिवस साजरा.वंचित न्यूज चॅनल : सहसंपादक:- श्रीरंग कांबळे. दिनांक:- 19/1/2023. कोल्हापूर : - लाखो लोकांच्या हृदयाची स्पंदनं चालू ठेवून अनेकांना जीवदान देणारे आणि गोरगरिबांचा आधारवड म्हणून समाजात मान्यता असलेले कोल्हापूर मधील टाकाळा येथील सिद्धिविनायक नर्सिंग होमचे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ.संजय देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम येथे अनेक उपक्रम राबविण्यात आले. भोजनदान व वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध महिला व पुरुष यांची मोफत तपासणी उपचार व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉ संजय देसाई यांनी सर्व वृद्धांची मोफत तपासणी, ईसीजी, शुगर इत्यादी तपासण्या करून वृद्धांना मार्गदर्शन केले. तसेच या वृद्धांना कोणतीही मदत लागत असेल तर आपण नेहमी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. कार्यक्रमात सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ संजय शिरगांवकर, गणेश पाटील, मुझमिल पटेल, मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष श्रीमती वैशाली राजशेखर, उपाध्यक्षा श्रीमती सूर्यप्रभा चिटणीस, सचिव सौ पूजा पाटील, सचिव सौ दिपाली पाटील आणि सर्व स्टाफ मेम्बर्स आणि वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबा उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ संजय शिरगांवकर, डॉ संजय देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत अध्यक्षा श्रीमती वैशाली राजशेखर तर आभार उपाध्यक्षा सूर्यप्रभा चिटणीस यांनी मानले.


Vanchit News