Vanchit News

जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठानच्याा वतीने सालाबाद प्रमाणे शिवजयंती निमित्त रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न.वंचित न्यूज चैनल :- उपसंपादक :सतीश जगताप. दिनांक18/02/2023 सालाबाद प्रमाणे जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठान टनु च्या वतीने शिवजयंती निमित्त, भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भिकाजी मोहिते यांचे हस्ते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमातील सुरुवात झाली. सदर स्पर्धेमध्ये तीस स्पर्धकांनी भाग घेतला होता, पैकी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गौरी रमेश कांबळे हिने पटकावले.आसावरी देवकुळे हिने द्वितीय,तर रिक्तम समंथा ह्याने तृतीय क्रमाक मिळविला. उत्तेजनार्थ चार स्पर्धकांना एक एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले, शिवजयंती निमित्त गेल्या 11 वर्षापासुन रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले जाते,ही परंपरा कायम चालू ठेवु,असे उद्गार जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक माजी सरपंच सोमनाथ मोहिते यांनी काढले, या स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील व इतरइतर ठिकाणाहून अनेक स्पर्धक आले होते, सूत्रसंचालन राजेंद्र मोहिते सर यांनीकेले तर आभार प्रदर्शन अभिजीत मोहिते यांनी केले ,व कार्यक्रमाची सांगता झाली.


Vanchit News