Vanchit News

भाजपला रामराम ठोकून पिटकेश्वर मधील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल.



* वंचित न्यूज चैनल: उपसंपादक: सतीश जगताप. दि.२६ आमदार दत्तात्रय मामा भरणे यांची काम करण्याची कार्यपध्दती व सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा जनतेचा आमदार म्हणून ओळख आहे तसेच इंदापूर तालुक्यातील सर्वच गावागावात विकासकामे चालू आहे आणि ही विकासकामे फक्त आमदार भरणे मामा यांच्या माध्यमातून सुरू आहेत त्यामुळे आम्हाला मामांची कार्यपद्धती आवडली व कुठलाही स्वार्थ आमच्या मनात न ठेवता आम्ही सर्वजण भापजा पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजीराव येरळकर यांनी सांगितले... विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तुळशीराम येरळकर पिटकेश्वरच्या मा.ग्रामपंचायत सदस्या व विद्यमान सोसायटी संचालिका उशा तानाजी येरळकर ,तानाजी येरळकर,सागर येरळकर, प्रदिप येरळकर, देविदास येरळकर, वसंत येरळकर,गोरख येरळकर, सचिन येरळकर,बबन येरळकर या सर्वांनी भाजप पक्षामधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की पिटकेश्वर गावाला जोडणारे सर्व बाजूंनी रस्ते मंजूर करून कामे प्रगतीपथावर आहेत त्याच बरोबर गावांतर्गत रस्ते,गटार ग्रामपंचायत कार्यालये,हायमास्ट दिवे,जल जीवन मिशन योजना अशा बहुतांशी कामे आपल्या पक्ष्याच्या माध्यमातून झाली आहेत. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी रोज बिले मागत आहे आणि यांनी रोज नवीन कारण पुढे करत शेतकऱ्यांना फसवत आहेत हे पाप कुठे फेडणार असा सवाल भरणे यांनी विचारला.आज इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची ओळख ही जातीयवादी पक्ष म्हणून आहे लोकांच्या मनात जातीवादाचे विष पेरण्याचे काम विरोधक करत असल्याचा घणाघात आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला...यावेळी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य सचिन सपकळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे तसेच युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले... यावेळी सतीश पांढरे, सचिन देवकर, पिटकेश्वर गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोयायटीचे संचालक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.






Vanchit News