Vanchit News

"मराठा" म्हणजे मोडीन पण वाकणार नाही हे भाष्य चुकीचे- डॉक्टर लक्ष्मण आसबे.वंचित न्यूज़ चैनल : उप संपादक : सतिश जगताप . दि.26/2/2023. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुळ भावकीच्या वतीने जय भवानी तरुण मंडळाचे सुनील मोहिते,रविराज भैय्या मोहिते,विकी गुजरे,विक्रांत मोहिते, आप्पासाहेब मोहिते, गणेश निंबाळकर,ऋषिकेश मोहिते,मयूर मोहिते,महेश मोहिते व गणेश मोहिते आदी आयोजकांच्या प्रयत्नातून हिंदवी स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात शिवभक्तांनी साजरी केली. टणु गावचे विद्यमान सरपंच शितल मोहिते, संचालक प्रकाश मोहिते,माजी सरपंच राजेंद्र मोहिते ग्रामपंचायत सदस्य तेजस मोहिते,अजित मोहिते तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब मोहिते,अमृत मोहिते श्रीकांत मोहिते सर व ग्रामपंचायत टणु व समस्त ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली.शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर लक्ष्मणराव आसबे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवचरित्रावर व्याख्यान सांगण्यात आले. शिवजयंती निमित्त बोलत असताना डॉक्टर असले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी डोळ्यासमोर ठेवून दारू गुटका मटका या पासून मुक्त व्हावे, चांगल्या मार्गाने जीवन जगावे लहान पिढीला संस्कार चांगले द्यावेत तसेच संपूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजांची प्रसिद्ध आहे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांचा विसर कधीच पडणार नाही डॉक्टर लक्ष्मण आसबे यांचे उद्गार.


Vanchit News