Vanchit News

वाईत दागिने बनविणाऱ्या दोन दुकानांवर धाडसी दरोडा. कोयता व बंदुकीचा धाक दाखवून केली चोरी



वंचित न्यूज चैनल : सातारा जिल्हा प्रतिनिध:यतीन गोळे. दिनांक-२९/०७/२०२४. वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण वाई येथील धर्मपुरी पेठेतील सोन्याचे दागिने बनविणाऱ्या दोन दुकानात बंदुकीचा धाक दाखवून धाडसी दरोडा टाकण्यात आल्याची माहिती मिळत असून घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी असून, सोन्याचे दागिने बनविणाऱ्या दोन दुकानांमध्ये बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील सोने लुटुन नेले. धर्मपुरी येथील विष्णू मंदिराच्या पाठीमागील बाजूस सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करणारे कारागिर आहेत. हे कारागिर वाईतील ज्वेलर्स व्यापाऱ्यांकडून सोने घेऊन दागिने बनवून देतात. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती दुचाकीवरून आल्या. त्यांनी विष्णू मंदिराच्या बाहेर गाडी (एमएच ०९- १९३७) लावून ते चालत गेले. विष्णू मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या एका दुकानात ते शिरले. त्या दुकानात संजय उर्फ नंदू मैती व चार कामगार काम करत बसले असता त्याना बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोने हिसकावून घेतले. दोघे बाहेर येऊन दुकानाचे शटर बाहेरून बंद केले. त्यानंतर त्या चोरांनी दुसऱ्या दुकानात प्रवेश करून तेथील कामगार मृत्युंजय जयंता मैती व तीन कामगारांनाही धाक दाखवून सोने हिसकावून घेतले. तेथून पलायन करून ते दुचाकीवरून पसार झाले. ही घटना समताच पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, भुईंजचे पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी घटना स्थळाला भेट दिली. घटनास्थाची फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.






Vanchit News