Vanchit News

घरगुती वादातून पोटच्या मुलानेच केला बापाचा खूनवंचित न्यूज चॅनल :- सह संपादक:- श्रीरंग कांबळे / कोल्हापूर:- दिनांक:- 16/5/23 चंदगड / कोल्हापूर दारुच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांचा गळा आवळून चाकूने वार करून खून केला व स्वतः आत्महत्या केली. ही घटना देसाईवाडी ता.चंदगड येथे रविवारी साडे नऊ वाजता घडली आहे. मनोहर गावडे वय वर्षे 58 मुलगा सागर मनोहर गावडे वय वर्षे 35 वर्ष याने गळा आवळून व चाकूने वार करून खून केला व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.याबाबत मनोहर गावडे यांच्या पत्नी मीनाक्षी गावडे रा.चंदगड देसाईवाडी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी चंदगड येथील सातवणेकर यांच्या घरी बारशाचा कार्यक्रम होता.यामध्ये सागर याने दारुच्या नशेत मीनाक्षी गावडे यांना तुझ्या पतीला संपावणार अशी धमकी दिली होती. त्यानुसार सागर याने धारदार चाकूने मनोहर यांच्या हातावर वार करून तसेच गळा आवळून मनोहर यांचा खून केला. तर स्वतः राहते घरी लाकडाच्या वाश्यास गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी मीनाक्षी मनोहर गावडे यांचे फिर्यादीवरून भा.द.वी. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज विभाग यांनी भेट दिली.


Vanchit News