Vanchit News

*सुरज वनसाळे यांचा " द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता " पुरस्काराने सन्मानवंचित न्यूज चैनल उपसंपादक :सतीश जगताप शुक्रवार दि.१६ जुन २०२३ रोजी लोणावळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बौध्दजन हितकारणी सभा ट्रस्ट, सम्यक क्रांती फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा " द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार" इंदापूर तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीतील निष्ठावान नेते, "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांना लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विद्यमान पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुर्यंकांत वाघमारे साहेब यांच्या हस्ते दिला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस गौतम सोनवणे, पुणे जिल्हाअध्यक्ष विक्रम शेलार, अहमदनगरचे जिल्हाअध्यक्ष सुनील साळवे, इंदापूर चे तालुकाअध्यक्ष बाळासाहेब सरवदे, जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, पुणे शहराचे अध्यक्ष शैलेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रविण लोंढे, विशाल सोनवणे, दत्तात्रय कांबळे व आंबेडकरवादी चळवळीतील संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेले दिग्गज नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. या सन्मानाने आंबेडकरवादी चळवळीत काम करताना प्रोत्साहन मिळणार आहे. आतापर्यंत चळवळीत केलेल्या कामाची पोचपावती या पुरस्काराने मिळाली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा नव्या उमेदीने गोरगरिबांच्या, मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी, अधिकारासाठी, मानसन्मानासाठी लढण्याचा निर्धार सुरज वनसाळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला


Vanchit News