Vanchit News

*अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला मिळाला उजाळा: (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९).**वंचित न्यूज चैनल सातारा जिल्हा प्रतिनिधी यतिन गोळे* कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा; जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.*या या कार्याचा गुणधर्म संबंध महाराष्ट्रभरच नव्हे तर जगाला या साहित्यिकाकडे पहावयास भाग पाडतो . अशा पद्धतीची माहिती सदर कार्यक्रमात देण्यात आली. या वेळी पाचगणी मधून , मा नगरसेविका आशाताई रुपेश बागडे , अंजली गुल्ला, सुभाष गुल्ला , शशी मोहिते , शेखर मोहिते , संतोष मोहिते , दीपक कांबळे , सनी भाई ननावरे , नितीन वंने, जुबेर भाई ,निलेश मोरे , सुदर्शन शिंदे , आनंद कांबळे , प्रियांका जाधव , सीमा मोहिते, लक्ष्मी मोहिते,(उर्फ सरिता), रूपाली मोहिते, संगीता मोहिते छाया खुडे, शितल मोहिते ,इंदुबाई सावंत, शुभ्रा मोहिते, सनी ननवरे, आशा बगाडे , कमल प्रभाळे, बेबी मोहिते, दिपाली चव्हाण, मीना नेटके, सीमा मोहिते,श्वेता सावंत, अंजली गुल्ला, शांताबाई बगाडे, सुनील बगाडे सचिन तांबे , हृषीकेश मोरे , महेंद्र सोनवणे , रावजी नाना कांबळे उपस्तीत होते आण्णा भाऊ साठे नगर येथून , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यला पुष्पहार घालून मिरवणूक पंचगणी बस स्टँड मार्गे टेबल लॅंड रोड ते पुन्हा भीमनगर , हून अण्णाभाऊ साठे नगर येथे रॅली काढण्यात आली होती , सदर कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्री सचिन तांबे यांनी केले , विविध मान्यवरांनी भाषण केले आणि सनी भाई ननावरे यांनी आभार मानले


Vanchit News