Vanchit News

सह संपादक :- श्रीरंग कांबळे तारीख :- 19/8/23 कोते / राधानगरी राधानगरी तालुक्यातील कोते पैकी रातांबिचा धनगरवाडा येथे शेतकऱ्यावर गवा रेड्याने हल्ला चढवला ही घटना बुधवार दि.16 रोजी घडली.रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीररीत्या जखमी झाला.गवा रेड्याने पाठीमागून जोराने धडक दिल्याने पाठीच्या मणक्यावर पडला.पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याने ताठ उभा राहता येत नसल्याने ग्रामस्थांनी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.सद्यस्थितीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत घटना अशी की बाबुराव सोनबा घुरके वय 32 वर्षे (रा.कोतेपैकी रातांबिचा धनगरवाडा ) साधारणपणे 100 ते 150 लोकवस्ती असलेला धनगरवाडा जाण्यासाठी कच्चा रस्ता तसेच अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे.घुरके हे बाव (विहीर) या शेतात भात पिकाला खत व मोडलेले बांध धरण्याचे काम करत असताना रेड्याने पाठीमागून जोराने हल्ला चढवला.या हल्ल्यात त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.बाबुराव घुरके यांची लहान मुले व घरची परिस्थिती बेताची असल्याने शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याभागात वनपाल विश्वास पाटील,वनरक्षक उमा जाधव तसेच वनसेवक जोतिराम कवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.


Vanchit News