गजापूर येथे पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

कोकण विभाग प्रमुख :- सखाराम कांबळे तारीख:- 26/8/23 अंबा/ शाहुवाडी:- गजापूर पैकी कांबळेवाडी येथील संघपाल श्रीधर कांबळे वय 14 याचा पोहण्यासाठी बंधाऱ्यात गेला असताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला शुक्रवारी दुपारी तीन च्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी दुपारी दोन वाजता संघपाल आपल्या मित्रांसोबत पोहण्यास निघाला त्यावेळी घरच्यांनी जाऊ नकोस म्हणून ओरडत असतानाही त्यांची नजर चुकून ग्रामपंचायत जवळील बंधाऱ्यात आंघोळीला उत्तरला पण त्याला पोहता येत नसल्याने जलाशयात बुडाला बुडाल्याचे वृत्त मित्रांनी धावत जाऊन त्याच्या घरी सांगितले स्थानिक तरुणांनी जलाशयात शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मृतदेह संध्याकाळपर्यंत सापडला नाही बंधाऱ्यात बारा फुटापर्यंत खोल पाणी आहे तसेच गाळ ही साचला आहे या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे संघपाल एकुलता एक होता दरम्यान शाहूवाडी आपत्कालीन व्यवस्थेमार्फत आज सकाळी पुन्हा त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे व शोध मोहीम चालूही केली आहे असे तहसील सूत्रांनी सांगितले