रत्नागिरी कोल्हापूर रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे

कोकण विभाग प्रमुख:- सखाराम कांबळे तारीख :- 3/10/23 कोल्हापूर रत्नागिरी रोडवर जुळेवाडी खिंडीत गॅस टँकर पलटी होऊन गॅस गळती झाल्यामुळे बांबवडे ते मलकापूर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे बांबवडे मार्गे रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक सरोडू रोड मार्गेरोड मार्गे शिंपे सवते तसेच कोकरूड ब्रिजवरून रत्नागिरीकडे वळवण्यात आलेली आहे सध्या बांबवडे पासून पुढे मलकापूर पर्यंत वाहतूक बंद करण्यात आलेली आहे