
कोकण विभाग प्रमुख :- सखाराम कांबळे तारीख:- 23 /9/23 अणुस्कुरा :- करंजफेन तालुका शाहूवाडी येथे एसटीची चाक डोक्यावरून गेल्याने आरोग्य सेविकेचा जागीच मृत्यू झाला स्वरूपा विजय शिंदे वय 30 वर्ष राहणार नणुंद्रे तालुका पन्हाळा असे त्यांचे नाव आहे शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला गर्भवती महिलेवर उपचार करून दोन जीव वाचवण्यासाठी लगबगीने निघालेल्या आरोग्य सेविकेला स्वतःचा जीव गमावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे स्वरूपा विजय शिंदे या प्राथमिक आरोग्य केंद्र करंज करंजफेन अंतर्गत येणाऱ्या नांदगाव आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून काम करत होत्या सावर्डे येथील सोनाली सुरेश कांबळे यांची प्रस्तुती करण्यासाठी पुन्हाळ येथील आरोग्य सेवक हैबती मगदूम यांच्यासोबत त्या दुचाकीवरून आरोग्य केंद्राकडे निघाल्या होत्या करंजफेन जवळच्या धावड्याच्या शेताजवळ करंजपेन होऊन नांदगाव कोतोली मार्गे कोल्हापूरला जाणारी एसटी समोरून आल्याने दु चाकी बाजूला घेत असताना बाजू पट्ट्या खचल्याने पुढील चाक घसरले व तोल जाऊन हैबती मगदूम व स्वरूपा शिंदे खाली पडले त्याचवेळी एसटीच्या मागील चाखाखाली शिंदे पडल्याने त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्यांचा जागीचमृत्यू झाला जखमी हैबती मगदूम यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पन्हाळा तालुक्यातील उत्तरे येथील सागर पाटील या एसटी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे