25 हजार रुपयांची लाच घेताना उप अभियंता लाच लुचपतच्या जाळ्यात

सह संपादक:- श्रीरंग कांबळे तारीख:- 29/9/23 चंदगड/कोल्हापूर चंदगड पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंता (वर्ग १)श्रीमती सुभद्रा लक्ष्मण कांबळे ( रा.बेळगाव,मूळ गाव साकेत पॅरडाईज आधारवाडी जेल रोड, कल्याण,जिल्हा ठाणे ) यांना २५ हजारांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.चंदगड तालुक्यातील घुल्लेवाडी गावात जलजीवन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे.पाणी पुरवठा योजना सुधारिकरण करण्याचे काम एका ठेकेदाराने घेतले आहे.या कामाचे बील मंजूर केले म्हणून १२ लाखाचे ३ टक्के प्रमाणे ३३ हजार मागणी केली. तडजोडीअंती २५ हजारांची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारताना कांबळे यांना रंगेहात पकडण्यात लाच लुचपत प्रतिबंध विभागाला यश आले.पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे,संजीव बंबर्गेकर, विकास माने,सुनील घोसाळकर, सचिन पाटील,पूनम पाटील यांनी कारवाई केली.