Vanchit News

*कर्तव्यात कसूर वळीवडेचे पोलीस पाटील 6 महिन्यासाठी निलंबित*करवीर तालुका प्रतिनिधी:- शुभम माने तारीख:- 30/9/23 उचगाव/वळीवडे( ता.करवीर ) येथील पोलीस पाटील प्रकाश पासांण्णा यांना कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तणूक केल्याबद्दल करवीर चे उपविभागीय दंडाधिकारी हरीश धार्मिक यांनी सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याचा आदेश दिला याबाबतची तक्रार वळीवडेचे ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत संन्मत दिगंबरे यांनी केली होती पोलीस पाटील दीपक पासांण्णा 2016 ला पोलीस पाटील पदावर रुजू झाले वळीवडेत 2019 ला आलेल्या पुरात नुकसान न झालेल्या व्यक्तींची नावे यादीत समाविष्ट केली होती भारत जोडो यात्रेत राष्ट्रीय पक्षाचा टी-शर्ट घालून राजकीय सहभाग नोंदविला होता तसेच दिगंबरे यांना पोलीस पाटील दीपक पासांण्णा यांनी धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद केली होती त्यानुसार दंडाधिकार्‍याने गांधीनगर पोलिसांना चौकशी अंतिम अहवाल मागवला होता त्यानुसार कर्तव्यात कसूर व गैरवर्तुणकीचा ठपका ठेवत करवीर चे उपविभागीय दंडाधिकारी यांनी 22 सप्टेंबरला पोलीस पाटील दिपक पासांण्णा यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे


Vanchit News