Vanchit News

श्री विठ्ठल कारखान्याची पहिली उचल २५५०रू. उचल जाहीर* *शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी विठ्ठल कारखाना कटिबद्ध* - चेअरमन अभिजीत पाटील. *अभिजीत पाटलांनी फोडली ऊस दाराची कोंडी* *विठ्ठल कारखान्यामुळेच सर्व कारखान्यांना अधिक दर द्यावा लागतोय* - चेअरमन अभिजीत पाटीलप्रतिनिधी पंढरपूर/- दिनांक२४ पंढरपूर तालुक्यातील अर्थवाहिनी म्हणून बघितल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४२वा गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी शोभाताई मोरे, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे मा.सदस्य अविनाश महागांवकर, जकराया साखर कारखान्याचे चेअरमन बिराप्पा जाधव व कारखान्याचे जेष्ठ सभासद हरी पाटील, खंडू सुरवसे, सुखदेव हाके, औदुंबर पोरे, वसंत वाघ, दगडू भोसले, बब्रुवान भोसले आदी मान्यवरांच्या तसेच पंढरपूरचे समाजसेवक संतोष भाऊ नेहतराव, धनंजय नाना कोताळकर, नगरसेवक प्रताप गंगेकर, महादेव धोत्रे, निलेश आंबरे, लखन चौगुले, बालाजी मलपे, शिवाजी मस्के, ऋषिकेश भालेराव, काकासाहेब पवार, आदित्य फत्तेपूरकर, नागेश गंगेकर, सुधीर धुमाळ, मंगळवेढा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला... यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष श्री अभिजीत पाटील म्हणाले की; गेल्या वर्षी सभासद शेतकरी सभासदांनी मतदानरूपी आशीर्वाद दिल्याने परिवर्तन घडून आले. आम्ही दुसरा गळीत हंगाम यशस्वीपणे चालू करीत आहोत. आपला कारखाना चालू झाल्यामुळे जिल्ह्यात ऊसदराची स्पर्धा निर्माण झाली, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना जास्तीत जास्त दर देणे भाग पडले. यावर्षी देखील आपल्या कारखान्याकडे ३७हजार एकर ऊसाची नोंद झाली असून तोडणी वाहतूक यंत्रणा टायर बैलगाडी, डम्पिंग ट्रॅक्टर व मोठ्या ट्रॅक्टरचे असे एकूण १हजार वाहनांचे करार पुर्णपणे झालेले आहेत. मशिनरीची देखभाल व दुरुस्ती करून कारखाना गाळपसाठी सज्ज करण्यात आलेला आहे. तरी सभासद बांधवांनी आपला सर्व ऊस इतर कारखान्यास न देता आपल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात दिल्यास मागील हंगामापेक्षाही जास्त गाळप होईल. आपल्या कारखान्याचा वजन काटा चोख असून जिल्ह्यात इतर कोणताही साखर कारखाना काट्यावर बोलत नसल्याचे अभिजीत पाटील म्हणाले... याप्रसंगी गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्रति मे.टन २५५०रू.ची पहिली उचल जाहीर करण्यात आली. सर्व ऊस उत्पादक शेतकरी व सभासद जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला. मागील हंगामात गळीतास असलेल्या ऊसास यापूर्वी प्रति मे.टन २४०० रूपये प्रति.टन याप्रमाणे अदा केलेले असून दिवाळी सणासाठी उर्वरित १००रुपये अंतिम हप्ता व सवलतीच्या दरामध्ये सभासदांना साखर देण्यात येईल. कारखाना आर्थिक अडचणीत असताना सुद्धा कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांची दिवाळी सण गोड होण्यासाठी १५दिवसाचा पगार बोनस व ११ दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घोषित केले. उजनी धरण 60 टक्के भरले असून त्यामध्ये 95 टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणी साठ्यातून चार पाळ्या सोडणेबाबत शासनास निवेदन देण्यात आले होते. सदर निवेदनाची शासनाने दखल घेऊन दिनांक २० ऑक्टोबर रोजी कालवा सल्लागार समितीची मीटिंगमध्ये दोन पाळ्या सोडण्याचे नियोजन करून १नोव्हेंबर पासून पहिली पाळी सोडण्यात येणार आहे. तसेच नीरा-भाडगर कॅनलला टेल टू हेड एक आवर्तन देण्याची तिसंगी-सोनके तलावात ही पाणी सोडणार असल्याचे सांगितले. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना असून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून शेततळी पाडून घ्यावेत व शेततळी पाण्याने भरून घ्यावेत. सद्यस्थितीत पाण्याचे व्यवस्थापन नियोजन करणे पाण्याची बचत करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठी ठिबक सिंचन योजनेचा वापर करावा असे शेतकऱ्यांना आवाहन केले. कारखान्यास आर्थिक सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई, लोकमंगल बँक, मनोरमा बँक व जकराया शुगरचे आभार व्यक्त केले. चेअरमन पाटील यांचा व्यवहार बोलका आहे. तोच व्यवहार बघून आम्ही बँकेने विश्वास ठेवला आणि अभिजीत पाटील यांना मदत करण्याचे ठरविले. श्री विठ्ठल कारखान्याचा इतिहास फार मोठा असून कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील हे चार ते पाच साखर कारखाने यशस्वी चालवत असल्यामुळे त्यांच्या अनुभवाच्या जोरावर या कारखान्यात गतवैभव प्राप्त करून देतील असे मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी मनोगत भाषणात म्हणाले. सदर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव मुंबई बँकेचे माजी सदस्य अविनाश महागावकर बोलताना म्हणाले की; अभिजीत पाटील हे माझे मित्र आहेत त्या मित्रत्वामध्ये मी कधीही राजकारण आणले नाही. विठ्ठल कारखान्याची काय दैनी अवस्था झाली होती ते मी जवळून बघितले आहे. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा असताना देखील कारखाना चालवण्याचे धाडस हे फक्त अभिजीत पाटील यांनी केले आहे व त्यांचे कौतुक आहे. बाहेरील जिल्ह्यात चार-पाच साखर कारखाने यशस्वी चालवल्याने त्यांच्या अनुभवाच्या जोरावर श्री विठ्ठल कारखान्याची घडी व्यवस्थित बसवून पंढरपूरची बाजारपेठ विठ्ठल मुळे फुलवली गेलेली असून गेली आहे. याप्रसंगी जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव म्हणाले की;अभिजीत पाटील हे माझ्या मित्राचा मुलगा असून शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे. तोच व्यक्ती ज्यावेळेस उच्च पदावर जाऊन बसतो त्यावेळी शेतकऱ्यांचा विकास होतो. त्यामुळे हा कारखाना चेअरमन अभिजीत पाटील हे उत्तम प्रकारे चालवतील असे विचार त्यांनी व्यक्त केले. सदर प्रसंगी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष सुधीर धुमाळ म्हणाले; की श्री विठ्ठल कारखाना हा महाराष्ट्र नावाजलेला कारखाना आहे. हा कारखाना चेअरमन अभिजीत पाटील उत्तम प्रकारे चालू केल्याने पंढरपूरची बाजारपेठेला देखील महत्त्व आले आहे. पुढे ही भविष्यात ही अभिजीत आबांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देऊया असे म्हणाले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना आपल्या हक्काचा कारखाना असून शेतकऱ्याचा राजवाडा आहे. सदर कारखाना टिकण्यासाठी चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. नगरसेवक बालाजी मालपे म्हणाले की; अभिजीत आबांनी बंद पडलेला श्री विठ्ठल कारखाना सुरू तर केलाच अशाच पद्धतीने येणाऱ्या नगरपालिकेला देखील आपण सर्वांनी एकत्र मिळून झेंडा अभिजीत आबा पाटील यांचा रोवूया असे महत्त्वपूर्ण भाषण केले. सदर नगरसेवक नागेश गंगेकर, आरपीआयचे संतोष पवार,डी.एस पाटील यांनीही आपले मनोगत केली. स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे कार्यलक्षी संचालक प्रा.तुकाराम मस्के यांनी केले तर कारखान्याचे संचालक श्री दिनकर चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव बी.पी.रोंगे सर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलताताई रोंगे, संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, तुकाराम मस्के, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, दत्तात्रय नरसाळे, जनक भोसले, प्रवीण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, तानाजी बागल, सचिन शिंदे पाटील, सविता विठ्ठल रणदिवे, कलावती महादेव खटके, सिद्धेश्वर बंडगर, अशोक जाधव, सिताराम गवळी, समाधान गाजरे, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक डी.आर गायकवाड, तसेच शिखर बँकेचे प्रतिनिधी सी.एस.पाटील, धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, कारखान्याचे आजी-माजी संचालक, पंढरपूर- मंगळवेढा नगरपालिकेचे आजी- माजी नगरसेवक, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते सभासद बांधव, व्यापारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Vanchit News