Vanchit News

*अनिल अण्णा पवार उर्फ आमचे मेंबर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित आरोग्य शिबिरास व रक्तदान शिबिरास युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद*वंचित न्यूज चैनल सहसंपादक सतीश जगताप दी.०७/११/२०२३ इंदापूर शहरांमध्ये आमचे मेंबर नावाने प्रसिद्ध असणारे अनिल अण्णा पवार यांचा सालाबाद प्रमाणे वाढदिवस आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर व अन्य अनेक उपक्रमांनी साजरा करण्यात आला अनिल अण्णा पवार हे सामाजिक कार्यामध्ये हिरहिरीने भाग घेऊन अनेक उपक्रम राबवत असतात जनसामान्यांशी नाळ जोडलेले हे व्यक्तिमत्व युवा वर्गाला व समाजाला वेगळी दिशा दाखवणारे इंदापूर शहरातील समाजशील व्यक्तिमत्व म्हणून नावारूपास आले आहे सलग तीन वर्ष आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून आपला वाढदिवस साजरा केला आहे. गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 505 रक्त पिशव्या जमा करून उच्चांकी रक्तदान शिबिर घडवून आणले अशाच प्रकारे सलग तिसऱ्या वर्षीही रक्तदानामध्ये उच्चांकी रक्तदान करून आपला वाढदिवस त्यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवून अनेक रुग्णांना सेवा देण्याचा उपक्रम केला सर्व पक्षातील लोकांना आपलेसे वाटणारे अनिल अण्णा पवार हे नावा रूपाला येत आहेत. इंदापूर तालुका इंदापूर शहर, व परिसरातील अनेक मान्यवरांनी व त्यांच्या मित्र परिवाराने उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


Vanchit News