Vanchit News

शितुर वारूण(शाहुवाडी)येथे बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय मुलगी ठार.वंचित न्यूज चॅनल: कोकण विभाग प्रमुख:- सखाराम जी कांबळे शाहूवाडी:- शितुर वारुण पैकी तळीचा वाडा येथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या सारीका बबन गावडे( वय 9 वर्ष ) तिच्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले.ही घटना दिनांक 20/11/2023 रोजी सकाळी 11:00 च्या सुमारास घडली.या वर्षातली ही दुसरी घटना आहे.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की सारिका आपली आई गंगाबाई गावडे यांच्यासोबत घराच्या शेजारी जनावरे चारण्यासाठी घेऊन गेली होती.यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सारीका हिच्यावर हल्ला केला.तिच्या आईने व शिवारात असलेल्या एका मुलाने तिला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बिबट्याने तिच्या नरडीचा घोट घेतल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या तीव्र जखमा दिसून येत होत्या ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती.घटनास्थळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा होता.वनविभागाच्या कर्मचाऱ्यासह मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना ग्रामस्थांच्या रोशाला सामोरे जावे लागले.यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.लोकांच्या एकही प्रश्नाला वन अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच बाजूला चांदोली अभयारण्य असल्यामुळे त्या अभयारण्यचा फटका नागरिकांना बसत आहे.अभयारण्यभोवती कोणतेही तारेचे कुंपण अथवा चर मारलेली नाही.त्यामुळे जंगली प्राण्यांचा वस्तीमध्ये सुळसुळाट आहे.तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा इथून पुढे होणाऱ्या घटनेस प्रशासन आणि वन अधिकारी जबाबदार असतील अशी लोकातून म्हटले जात आहे.


Vanchit News