Vanchit News

इंदापूर तालुक्यातील सर्वच निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढवणार.वंचित न्यूज चॅनेल : दि.२५,पुणे जिल्हा प्रतिनिधी : सतीश जगताप इंदापूर तालुक्यातील वंचीत बहुजन आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांची मिटींग काल शासकिय विश्रामगृहात पार पडली या वेळी मार्गदर्शक हनुमंत तात्या कांबळे यांनी सर्वांनां निवडणूकीसाठी तयार राहण्या चे संकेत वरिष्ट पातळीवरुन असल्याचे सांगितले आपल्या पक्षाकडून इंदापूर तालुक्यातील सर्वच निवडणूका आपण स्वबळावर लढवणार आहोत तरी तयारीला लागा असे मा.प्रमोद चव्हाण यांनी सांगितले, सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार उमेदवार निवड केली जाईल. इंदापूर नगर परिषदेच्या सर्व जागा वंचीत बहुजन आघाडी लढवणार असल्याचे हनुमंत तात्या यांनी सांगितले, यावेळी माजी शहर प्रमुख हनुमंत तात्या कांबळे ,प्रमोद चव्हाण, ता.सचिव अमोल भोसले, पवन पवार, महीला आघाडी प्रमुख मनिषा चंदनशिवे,व प्रसिद्धी प्रमुख अतुल सोनकांबळे,व तालुक्यातील तमाम वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते हजर होते.


Vanchit News