Vanchit News

दिल्ली येथील कार्यक्रमाप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले निमगाव केतकीचे सुपुत्र श्री संतोषजी राजगुरू यांचा मा.राज्यमंत्री आमदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी भरणेवाडी येथे शाल व फेटा श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस दिल्या शब्दरूपी शुभेच्छा.वंचित न्यूज चॅनेल : - पुणे जिल्हा प्रतिनिधी- सतिश जगताप सावता परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्य प्रदेश संघटक म्हणून संपूर्ण राज्यभरात सामाजिक कार्य करणारे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावचे सुपुत्र श्री संतोषजी राजगुरू यांच्या कार्याची दखल घेऊन नूकताच दिल्ली येथील कार्यक्रमाप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे इंदापूर तालुक्यात आगमन होताच मा.राज्यमंत्री आमदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी भरणेवाडी येथील निवासस्थानी इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने श्री संतोषजी राजगुरू यांचा शाल,फेटा,श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करताना आदरणीय श्री भरणे मामा यांनी श्री संतोषजी राजगुरू यांनी सावता परिषदेच्या माध्यमातून आपल्या राज्यभरातील समाजबांधवांना चांगल्या प्रकारे संघटीत करून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम केल्याचे सांगून समस्त माझ्या माळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज तीर्थक्षेत्र अरण येथील विश्वस्त म्हणून ते अनेक वर्षे चांगले काम करत असून गावकुश पेपरचे कार्यकारी संपादक म्हणूनही त्यांचे काम चांगले असल्याचे गौरवोद्गार आदरणीय श्री भरणे मामा यांनी यावेळी काढले.याप्रसंगी आदरणीय श्री भरणे मामा यांनी इंदापूर तालूका शिवसेना नेते श्री बबनराव खराडे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. या सत्काराप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री विजयराव हेगडे, इंदापूर तालूका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक श्री कोंडीबा भोंग,पिटकेश्वर गावचे माजी सरपंच व सावता परिषदेचे तालूका उपाध्यक्ष श्री विष्णू झगडे,माजी उपसरपंच श्री अंकुश म्हस्के यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.


Vanchit News