Vanchit News

देवाळे- कोल्हापूर येथील दलित युवकांनी न्यायासाठी दिला आत्मदहनाचा इशारा.वंचित न्यूज चॅनेल : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी:- मिलिंद सामुद्रे, दि.१२-०८-२०२२ मु. पो. देवाळे ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर गावातील अनिकेत दिलीप माने, जीवन अशोक थोरात, वैभव दिनकर माने, विक्रम आनंदा साळोखे या चार युवकांनी १६ मे रोजी देवाळे गावामध्ये महापुरुषांची मिरवणूक अडवली गेली व शिवीगाळ केली याची केस नोंद केलीआहे.नोंद केलेली केस मागे घेण्यासाठी या गावातील लोक अनेक प्रकारे दलित लोकांना त्रास देत आहेत.उदा. शेतातील कामासाठी ट्रॅक्टर्स न देणे,जाता येता अडवून केस मागे घ्या नाहीतर अवघड होईल अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. या चार युवकांच्या मते पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दाद घेतली जात नाही. म्हणून यासाठी येथील युवक आत्मदहन आंदोलन करीत आहेत.यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पक्ष आणि संघटना यांनी या आंदोलनास पाठिंबा द्यावा अशी विनंती केली आहे.


Vanchit News