Vanchit News

बावडा दुरक्षेत्र पोलिसांकडून दोघा जनावर प्राणी संरक्षण कायदया अंतर्गत गुन्हे दाखल.वंचित न्यूज चॅनेल: बावडा:दि. ०६/०९/२०२२ उपसंपादक- सतीश जगताप बारामती तालुक्यातून सोलापूरकडे बावडा वालचंद नगर रोडने, आयशर टेम्पोमध्ये निर्दयतेने कोंबून जनावरे नेत असलेल्या ,आयशर कंपनीच्या टेम्पो सह11 जर्सी गाई, व एक देशी गाय,कत्तलीसाठी घेऊन जात असताना ,बावडा दुरक्षेत्र पोलिसांनी वालचंद नगर -बावडा रोड वरती, सापळा रचून मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतले ,असून टेम्पो चालकाचे नाव- बंदेनवाज ख्वाजा शेख, व त्याचा साथीदार रमजान ख्वाजाभाई शेख, यांना ताब्यात घेण्यात आले आहे.एकूण बारा गाईंची किंमत अंदाजे 96 हजार व आयशर ट्रक ची किंमत दहा लाख रुपये असा एकूण दहा लाख 96 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बारा गाईंना पांजरपोळ्यामध्ये योग्य त्या बंदोबस्तात जमा करण्यात आले. सदरचा आयशर टेम्पो बावडा दुरक्षत्र येथे आणून प्राणी संरक्षण अधिनियम व इतर कायद्यान्वयेबारा गाईंना पांजरपोळ्यामध्ये योग्य त्या बंदोबस्तात जमा करण्यात आले सदरचा आयशर टेम्पो बावडा दुरक्षत्र येथे आणून प्राणी संरक्षण अधिनियम व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा. डॉ.अभिनव देशमुख साहेब ,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. मिलिंद मोहिते साहेब,पोलीस उपाधीक्षक मा. गणेश इंगळे साहेब,इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. मुजावर साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एन .जी. पाटील साहेब,पो.ना. सलमान खान,पो.ना.कळसाईत,पो.कॉ.काळे,पो.कॉ.सय्यद, यांनी मिळून ही कारवाई केली.


Vanchit News