Vanchit News

आळतेच्या छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी.वंचित न्यूज चॅनल : दिनांक:- 11/9/2022 हातकणंगले तालुका प्रतिनिधी:- विकी कांबळे राजकारण विरहित फक्त सामाजिक कार्यात पुढारपण असलेले आणि सात मंडळ एकत्रित येऊन गणेश उत्सव साजरा करणारे पंचक्रोशीतील एकमेव तरुण मंडळ म्हणजे आळते तालुका हातकणंगले येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मंडळांना एकीची हाक मारून आपण एकत्रित राहून समाजासाठी काही तरी करू अशी साद घालून तब्बल सात मंडळांना एकत्रित करून एक बलाढ्य कार्यकर्त्याची फौज तयार करून सर्वजण अगदी थाटमाट साजरे करणारे मंडळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येते नुसते सण उत्सव साजरे करण्या पुरते हे मंडळ नाही तर रक्तदान शिबिर गरीब विद्यार्थ्यांना वह्या गणवेश वाटप तरुण वर्गासाठी जिम चालू केली पुस्तकांनी मस्तक सुधारते म्हणून वाचनालयाची निर्मिती केली असे अनेक सामाजिक उपक्रम या मंडळांनी आतापर्यंत केले आहेत पुढील काळातील विविध उपक्रम राबू असा ठाम विश्वास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला गणेश उत्सवाच्या निमित्ताने धनगर समाजाच्या वतीने महाप्रसादाचे भव्य मोठे असे आयोजन केले जाते विसर्जन सोहळा अगदी दिमागदार पद्धतीने पारंपारिक वाद्यात व पारंपारिक वेशभूषेमध्ये पार पाडला जातो सदर मंडळांनी गणेश उत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले अनेक महिलाही सहभागी झाल्या होत्या विसर्जन मिरवणूक ही शांततेत या मंडळांनी पार पाडली या स्तुत्य उपक्रमाबद्दल पंचक्रोशी मध्ये व पोलीस प्रशासनामध्येही छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचे कौतुक होत आहे.


Vanchit News