Vanchit News

कै.अभिजीत कदम विद्यालय मेथवडे या शाळेचे सहशिक्षक खंडू लाडे मुख्याध्यापक मेटकरी,व संस्थापक अध्यक्ष श्री इंगवले सर यांच्यावर शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून शिक्षण अधिकारी माध्यमिक सोलापूर यांना चौकशीचे आदेश.वंचित न्यूज चैनल : पुणे ,दि.१७/०९/२०२२ उपसंपादक : सतीश जगताप. कै. अभिजीत कदम विद्यालय ,तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. येथील सहशिक्षक श्रीखंडू लाडे, मुख्याध्यापक श्री मेटकरी, व संस्थापक अध्यक्ष श्री इंगवले यांच्या संगणमताने रजा काळातील गैरप्रकार व शाळेला कोणत्याही भौतिक सुविधा नसताना घेतलेले 100% अनुदान या सर्व गैरप्रकारां बाबत वंचित न्यूज मीडिया मार्फत माध्यमिक शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना रीतसर निवेदन देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी व्हावी ,अशा आशयाचे पत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे दिले याच. पत्राची दखल घेऊन शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी तातडीने शिक्षण अधिकारी माध्यमिक सोलापूर यांना सदर शिक्षक, मुख्याध्यापक ,व संस्थापक, यांची सखोल चौकशी करून ,चौकशी अहवाल घेण्यात यावा, असे आदेश काढण्यात आले आहेत.


Vanchit News