Vanchit News

इंदापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब सरवदे यांची निवड.वंचित न्यूज चॅनेल : दिनांक 30, उपसंपादक :सतिश जगताप. इंदापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब सरवदे, इंदापूर शहर अध्यक्षपदी अमोल मिसाळ व इंदापूर तालुका युवक अध्यक्षपदी संदेश सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. आज शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात पश्र्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व लोनावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रभारी संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड पंचायत समितीचे उपसभापती व इंदापूर तालुका निरिक्षक विकास कदम दौंड तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे नरेश डाळींबे सरचिटणीस गणेश गायकवाड व इंदापूर तालुका मार्गदर्शक संदीपान कडवळे यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवाजीराव मखरे, विकास कदम,गणेश गायकवाड, संदीपान कडवळे,अमोल मिसाळ, नितीन झेंडे,यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक राकेश कांबळे केले तर आभार महेश सरवदे यांनी मानले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण मखरे विकास भोसले प्रताप मिसाळ जयकुमार सोनवणे दिगंबर चव्हाण भारत सावंत अर्जुन चितारे सोमनाथ चितारे यांनी परिश्रम घेतले.


Vanchit News