Vanchit News

सातारा येथील पाचगणी मध्ये वीज कोसळून तीन घोड्यांचा मृत्यु. ऐन दिवाळीच्या सणात मरण पावलेले घोड्यांचे मालक आर्थिक संकटात.वंचित न्यूज चॅनेल : - सातारा जिल्हा प्रतिनिधी: यतिन गोळे. दि. 20/10/2022. पाचागणी येथील टेबल लांड येथील परीसरात परतीच्या पाऊसाने थैमान घातले आहे. याच परतीच्या पाऊसात पाचागणीतील टेबल लांड परिसरातील संभाजी दामगुडे यांचे दोन घोडे वीज कोसळून मरण पावले व त्याच बरोबर संजय कांबळे यांचा ही एक घोडा मरण पावला. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि सीजन मध्ये त्यांचे घोड सावरी चा धंदा बंद पडला. त्याच बरोबर त्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या दोन्ही कुटूंबाची आर्थिक अडचण होणार आहे.


Vanchit News