Vanchit News

पंढरपूर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुजन ब्रिगेड संघटनेचे निवेदन.वंचित न्यूज चॅनेल : पंढरपूर शहर प्रतिनिधी: दिपक वाघमारे. दि.४/११/२०२२. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल निवेदन दिले. पंढरपूर तालुक्यातील मेंढापुर ते पखालपूर,मेंढापुर ते चिलाईवाडी, मेंढापुर ते करकंब,भोसे पाटी ते करकंब,भोसे पाटी ते रोपळे बुद्रुक,पंढरपूर - कुर्डुवाडी या रेल्वे लाईन असलेल्या रोपळे बुद्रुक या गावाजवळ व मेंढापुर ते रोपळे या रस्त्यावर असलेल्या रेल्वे बोगदा मार्ग या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून या सर्व रस्त्यावर रोज अपघात होत आहेत,असे निवेदनात नमूद केले असून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून पंढरपूर तालुक्यातील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केली आहे.


Vanchit News