Vanchit News

बौद्धांची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवक यांच्यावर कारवाही होणार का?वंचित न्युज:- कोल्हापूर प्रतिनिधी:- मिलिंद सामुद्रे दि. 05-11-2022 नॅशनल ब्लॅक पँथर राष्ट्रीय अध्यक्षा सुवर्णाताई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली 07-11-2022 रोजी होणारे आंदोलन थांबवण्यात यावे या साठी स्वतः गट विकास अधिकारी सावंत सर विस्तार अधिकारी तळपे सर यांनी शहापूर ग्राम पंचायत मध्ये येऊन स्टकचर ऑडिट प्रत्यक्ष पाहणी करून घेण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिलाआहे त्याच बरोबर निरलेखन बाबत काय कारवाई केली? त्याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. दिलेल्या आदेशाचे पालन 20 दिवसात न झाल्यास कठोर कारवाही करू असे सांगण्यात आले.असे असले तरी सुधा निरलेखन न झाल्याचे कागदपत्रे दाखवून सुद्धा संबंधित अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर कारवाही न करता पर्याय शोधून वरील आदेश दिले त्यामुळे निरलेखन न करता बौद्धांच्या धार्मिक स्थळांच्या अपमान करणाऱ्या व फक्त पैसे लाटण्याच्या उद्देशाने विहार उध्वस्त करून बांधण्यात आलेले नवीन इमारत अर्धवट ठेवली. इंस्टीमेंट प्रमाणे मंदिर पूर्ण झाले आहे म्हणून दाखला दिलेल्या ग्रामसेवक सुवासिनी गुरव मॅडम यांच्यावर काय कारवाही होणार का? असा प्रस्न शहापूर मधील ग्रामस्थांना पडलेला आहे.


Vanchit News