Vanchit News

शाहूवाडीतील पहिला सार्वजनिक दवाखाना झाला 83 वर्षाचा...



वंचित न्यूज चॅनल : कोकण विभाग प्रमुख :- सखाराम कांबळे. दिनांक :- 1/4/2023. आंबा शाहूवाडी :- छत्रपती राजाराम महाराज यांच्या शिफारशीतून इलाका पंचायतीचे प्रेसिडेंट असताना विश्वनाथराव पाटील यांनी विशेष बाब म्हणून दोन एप्रिल 1940 मध्ये शाहूवाडी तालुक्यात पहिल्यांदा सार्वजनिक दवाखाना स्थापित केला दवाखान्याला रविवारी 2 एप्रिल ला 83 वर्ष पूर्ण होत असल्याची माहिती इतिहास अभ्यासक प्राचार्य सुहास नाईक यांनी दिली सध्या वास्तुत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे विश्वनाथराव पाटील यांनी दवाखान्याचे उद्घाटन 2 एप्रिल 1940 ला केले याबाबत प्राचार्य नाईक म्हणाले जाहीरनाम्यातील तरतुदीनुसार छत्रपती राजाराम महाराज यांनी आरोग्याच्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून दवाखाना बांधण्याची परवानगी दिली यासाठी चनवाड शाहूवाडीच्या माळावरची जमीन संपादित केली सात खोल्यांची साधी दगड आणि कौलारू छप्पर असणारी इमारत बांधली गेले .इमारतीसाठीच्या दगडासाठी चनवाड मध्ये खान खोदली तर कौले एच अँड सी कंपनीने पुरवली पांडुरंग सुतार यांनी लाकूड दिले या दवाखान्याच्या बांधकामासाठी इलाका पंचायत करवीर यांनी खर्च केला होता. इलाका पंचायत करवीर यांनी स्थापन केलेला दवाखाना शाहूवाडी तालुक्याच्या आरोग्य सेवेचा प्रारंभ बिंदू आहे छत्रपती राजाराम महाराज यांच्या स्मृती आणि ऐतिहासिक वास्तूचे मोल लक्षात घेऊन वास्तूचे संवर्धन होणे गरजेचे आहे.






Vanchit News