Vanchit News

घराघरात नळ पाणीपुरवठा योजना, पोहोचवणार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन.



वंचित न्यूज चॅनेल: इंदापुर, दि.२९/०८/२०२२ उपसंपादक :- सतीश जगताप. इंदापूर तालुक्याच्या प्रत्येक घराघरात नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी देणार. आमदार दत्तात्रय भरणे यांचे बळपुडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभाप्रसंगी प्रतिपादन...................... मौजे बळपुडी गावात जलनायक आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला. या योजने करिता तब्बल 1 कोटी 30 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे . यावेळी विकासरत्न आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 146 गावातील जल जीवन मिशन या योजनेचा प्रारूप आराखडा दिनांक 12 मार्च 2021 रोजी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री नामदार अजितदादा पवार, यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे 250 कोटी रुपये इतका मंजूर करण्यात आला होता त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये योजनेचे डी एस आर रेट वाढल्याने तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण केल्याने या योजनेचा आराखडा जवळपास 454 कोटी रुपये इतका करण्यात आला या योजनेतील बहुतांशी कामे आत्तापर्यंत टेंडर होऊन प्रत्यक्षात चालू झाली आहे जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील कामे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर आहेत, ही कामे एप्रिल तसेच मे महिन्यामध्ये महाराष्ट्र मध्ये महावीर कसा आघाडी सरकार असताना तांत्रिक मान्यता घेऊन शासनाकडे प्रशासकीय मान्यता करिता पाठवले आहेत ,त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली होती तसेच काही कामे मंजुरीस्तव सादर होती जून महिन्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले या सरकारमध्येही पाणीपुरवठा मंत्री म्हणून गुलाबराव पाटीलच आहेत इंदापूरची पाठवलेली सर्व कामे हे आपल्या सांगण्यावरून मंजूर केल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली .ज्यांना कुठलाही अधिकार नाही कुठलेही पद नाही त्यांनी एखादी ग्रामपंचायत ताब्यात असली म्हणून त्या ग्रामपंचायतचा मंजूर झालेला निधी सरपंचांना हाताशी धरून पत्रकार परिषद घेऊन आम्ही योजना मंजूर केली ,असे खोटे नाटे तसेच कुठलाही संबंध नसताना जाहीर करणे हे त्यांना शोभते, का असा सवाल आमदार भरणे यांनी विचारला. यावेळी कुठलीही योजना तसेच कुठल्याही तालुक्यातील शासकीय काम हे तालुक्यातील आमदार यांनी ठरवायचे असते तसेच साधी पाणीटंचाईवरील टँकरची मंजुरी घेण्यासाठी सुद्धा आमदारांची सही लागते हे वीस वर्षे मंत्री असलेल्या माजी मंत्र्यांना सुद्धा माहित नाही का असा जाहीर सवाल आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपस्थितांना करून जनतेने आपले बहुमोल मत देऊन जनतेच्या मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मला आमदार म्हणून दोनदा निवडून दिले, असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध व खंबीर असून न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये, त्यांना जनतेने विश्रांतीचा सल्ला दिला असून त्याचे पालन त्यांनी करावे .असे सांगून आमदार दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बळपुडी ग्रामस्थांच्या वतीने विकासरत्न आमदार दत्तात्रय भरणे यांची गजरांच्या वाद्यात व फटाक्यांची आतिषबाजी करून उत्साही वातावरणात घोड्यावरून जंगी मिरवणूक काढली.या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत बळपुडी गावचे विजय चोरमले ,यांनी स्वागत केले.यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम निंबाळकर,बळपुडी सोसायटीचे चेअरमन प्रताप गाढवे तसेच बळपुडी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Vanchit News