Vanchit News

माझ्या बळीराजाला आणि जनतेला सुखाचे,समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे दिवस येऊ दे असे साकडे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष युवराज मामा बोळ यांनी नरसिंहाकडे घातले.



वंचित न्यूज चैनल: उपसंपादक :सतीश जगताप. निरा नरसिंहपुर: दिनांक-7/05/2023. इंदापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र निरा नरसिंहपुर येथे नरसिंह जयंती निमित्त जंगी कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा इंदापूर तालुका अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज मामा पोळ यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी ते निरा नरसिंहपूर येथे जंगी कुस्त्या पाहण्यासाठी आले होते.कुस्त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ते लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर नरसिंहाचे दर्शन घेताना नरसिंहाला सांगितले की माझा शेतकरी राजा आणि जनता यांना सुखाचे, समाधानाचे,आनंदाचे आणि भरभराटीचे दिवस येऊ दे. युवराज मामा पोळ म्हणाले की,मी 90% हे समाजकारण करतो आणि 10 % फक्त राजकारण करतो. समाजसेवा ही माझा माझ्या जीवाचा प्राण आहे. गोरगरीब, शोषित , पीडित, दीन, दलित लोकांना न्याय मिळवून देणे यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे आणि करत राहील. इंदापूर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षांपूर्वीपासून भीमशक्ती सामाजिक संघटना आणि सिंहा फाउंडेशन हे गोरगरीब,शोषित, वंचित, पीडित जनतेसाठी अहोरात्र काम करत आहे आणि यापुढेही आपण कुठल्याही स्वार्थ न आणता अतिशय प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करत राहू. या कार्यक्रमाच्या प्रसंगी निरा नरसिंहपुर येथे जंगी कुस्त्यांच्या मैदानामध्ये युवराज मामा पोळ यांचा सत्कार हे निरा नरसिंहपूरचे सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, सिने अभिनेते आणि दिग्दर्शक नितीन सरवदे, माजी सरपंच पैलवान अण्णासाहेब काळे, वस्ताद सचिन कदम यांनी फेटा बांधून शाल, श्रीफळ व हार घालून केला. यावेळी एडवोकेट भैय्यासाहेब पोळ यांचाही सत्कार येथे करण्यात आला. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या इंदापूर तालुक्यामध्ये 70 शाखा आहेत. या शाखेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही निरा नरसिंहपुर गावांमध्ये उपस्थित होते.याच्यामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पिंपरी शाखेचे अध्यक्ष नबीलाल शेख, गिरवी शाखेचे अध्यक्ष कदम, उपाध्यक्ष समाधान ठोकळे, तसेच बिभीषण कोळी, बाळासाहेब सुतार, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, सतीश जगताप, आनंद धांडोरे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.






Vanchit News