आमदाराच्या गावातच रस्त्ता दुरूस्ती कामाच्या वाजल्या बारा.

वंचित न्यूज चैनल उपसंपादक :सतीश जगताप (सर) दि.१७. इंदापूर तालुक्यात लोकप्रतिनधींच्या प्रयत्नातुन रस्ता विकास कामे धुमधडाक्यात सुरू असल्याचा गवगवा केला जात असतानाच,केलेल्या कामांचा दर्जा खराब असल्याच्या तक्रारींचा तालुक्यात पुर आल्याचे चित्रही दिसुन येत आहे. टक्केवारीची नशा इतकी चढली की,लोक प्रतिनिधी,ठेकेदार व संबधीत विभागाचे अधिकारी यांना कामाच्या दर्जाचे भान राहीले नाही.याचा दुष्परिणाम आमदाराच्या भरणेवाडी गावातही पहायला मीळाला.भरणेवाडी गावचे शेतकरी व इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक चंद्रकांत लक्ष्मन बोराटे यांनी चक्क राज्याचे मुख्यमंत्री यांना तक्रार निवेदन पाठवून तक्रार केली आहे.निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवुन ठेकेदार,भिगवण उपअभियंता,शाखा अभियंता यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास भरणेवाडी ग्रामपंचायतसमोर दि.२३ जून पासुन बेमुदत धरणे आंदोलण करण्याचा इशारा दील्याने तालुक्यातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या असुन पारावरच्या चर्चेला उधाण आल्याचे दिसुन येत आहे. इंदापूर तालुक्यातील बोरी ते येसुपारवाडी शेळगाव या २४०० मीटर रस्त्ता काम सध्या इंदापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहे.विशेष दुरूस्ती अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी चार कोटी ८० लक्ष रूपये प्रशासकीय मान्यतेचे काम असुन सदरचे काम हे आणिल देशमुख यांचे मे.पदमीनी कंन्स्ट्रक्शन या कंपनीच्या माध्यमातुन सरू आहे. रस्त्याच्या धावपट्टीचे पुर्वीचे रूंदीकरण हे ३.७५ मी.चे होते.ते नविन दुरूस्तीमध्ये ५.५० मी.करण्याचे प्रस्तावित आहे.परंतु ठेकेदाराने जुन्या ३.७५ मी. डांबरी पृष्ठभागाचे पिचिंग न करता जेसीबीच्या सहाय्याने जुना रस्ता पुर्णपणे उकरून काढला आहे. त्यातुन निघालेली जूनी खडी व जूने डांबर मटेरियलचा वापर रस्ता दुरूस्ती व२५०मी.मी.डबल्यू.एम.एम. साठी वापर करून रस्त्यावर पसरले आहे.व ते रोड रोलरने चोपून घेतले आहे.आणि रस्त्याच्या दोन्ही बाजुने साईट पट्या माती टाकुन रस्त्याचे दर्जाहीन काम सुरू आहे. संबधीत कंपनीचे ठेकेदाराकडून सदरचे काम फारच निकृष्ट दर्जाचे व इस्टिमेंट मध्ये दीलेले नियम पायदळी तुडवुन सुरू आहे.जुना डांबरी रस्त्ता दुरूस्तीसाठी त्यावर पिचिंग न करता जेसीबीच्या सहाय्याने रस्ता उकरून त्यातुन निघालेली जूनी व निकृष्ट दर्जाची डांबर मिश्रीत खडीचा वापर रस्त्यावर २५० मी.मी.डब्लू. एम.एम. साठी करून रस्ता दुरूस्ती काम सुरू आहे.ही अतिशय गंभिर स्वरूपाची बाब आहे.सदर कामाचे ठिकाणी दोष निवारण कालावधी दर्शविणारे फलक व माहिती दर्शक फलक लावलेले नाहीत.तर झालेल्या कामाची तपासणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून चौकशी पथक नेमावे.सदर पथकामार्फत संबधीत कामाची तपासणी चौकशी करण्यात यावी.सदर कामाची तपासणी क्वालिटी कंट्रोलकडुन व्हावी, सदर काम करणारे ठेकेदार यांना केलेल्या कामाचे बील अदा करण्यात येवू नये. माझे शेतातुन नवीन रस्ता निर्मीती होत असताना अशा प्रकारे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करावे हे मला मान्य नाही. सा.बा.विभाग प्रशासकीय अधिकारी हे ठेकेदाराला पाठीशी घालुन त्याने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर पांघरून घालण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असल्याचे दिसुन येत आहे.खालील मागण्यांची चौकशी करण्याचे आदेश व्हावेत.,सदर कामाचा दर्जा काॅलीटी कंट्रोलकडून तपासणी करण्याचे आदेश व्हावेत.चालु कामाचे बील तात्काळ थांबविण्याचे आदेश व्हावेत.सदर काम पाहणारे अधिक्षक अभियंता,सा.बा.मंडळ पुणे,कार्यकारी अभियंता,सा.बा. पर्व विभाग पुणे.,सहाय्यक अभियंता व शाखा अभियंता भिगवण यांनी कामात हलगर्जीपणा केला असुन त्यांचेवर कारवाईचे आदेश व्हावेत, ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे.अन्यथा दि.२३ जून पासुन ग्रामसचिवालय भरणेवाडी कार्यालय, ता.इंदापूर या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलण करण्यात येणार आहे.धरणे आंदोलण काळात तक्रारकर्ते यांचे जिवितास काही बरे वाईट घडल्यास वरील सर्व अधिकारी, सदर काम करणारा ठेकेदार व त्यांचे काही हितचिंतक यांना जबाबदार धरण्यात यावे.व तक्रारदार यांना न्याय मिळावा असे चंद्रकांत बोराटे यांनी निवेदनात म्हटले आहे.