Vanchit News

*यू रिया खतासोबत लिंकिंग खते विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले* *पुणे जिल्ह्यातील पाच कृषी सेवा केंद्र तसेच रासायनिक खत विक्रेते यांचा परवाना रद्द* *बळीराजाच्या अन्यायविरोधात बहुजन ब्रिगेड महासंघ आक्रमक.*सहसंपादक: सतीश जगताप दी.०८ दौंड तालुक्यातील खत विक्रेते कृषी सेवा केंद्र व रासायनिक खते वितरक यांनी कंपनीच्या नावाखाली शेतकऱ्यांना युरिया खता सोबत इतर लिंकिंगची खते घेण्यास भाग पाडून शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट करीत असल्याने व शेतकऱ्यांचे आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय पुणे यांना तक्रार देण्यात आली होती. तथापी विहित वेळेत संबंधित कृषी सेवा केंद्र परवानाधारक व खतविक्रेते यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय पुणे यांना संघटनेच्या वतीने दिनांक 7 /11/ 2023 रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला .तदनंतर काही कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संंदिपजी मोहिते उपाध्यक्ष गणेशभाऊ साठे यांनी थेट कृषी आयुक्तालय गाठले व सदर विषयाचे गांभीर्य सांगुन ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोरील आंदोलन हे स्थगित करत मा. कृषी आयुक्त सो तथा कृषी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र शासन पुणे यांच्या कार्यालयासमोर दिनांक 7/11/2023 रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने दि.30ऑक्टोबर ला देण्यात आला. त्यानुसार विषयाचे गांभीर्य ओळखून मा कृषी आयुक्त सो तथा मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे यांनी प्रथम प्राधान्य व तात्काळ बाब म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांना आदेशित करून सदर खत विक्रेते व कृषी सेवा केंद्र परवाना धारक यांच्यावर कारवाई करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळणे कामे तत्पर कारवाई करण्याचे आदेश केले. त्यानुसार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांनी दिनांक 6 /11/ 2023 रोजी शिवाजीनगर पुणे येथील कार्यालयास सुनावणी घेऊन तसेच निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये आढळून आलेल्या दोष व त्रुटी यांच्या अनुषंगाने दौंड तालुक्यातील एकूण पाच कृषी सेवा केंद्रांच्या लायसन्स म्हणजेच परवाना रद्द करून बेकायदेशीर लिंकिंगची खते शेतकऱ्यांच्या माथी करणाऱ्या व मनमानीपणा करणाऱ्या खतविक्रेते यांना चांगलाच धडा शिकवत त्यांचे परवाने रद्द करून बळीराजाची होणारी पिळवणूक थांबविल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे या धडाकेबाज कारवाई बाबत मा कृषी आयुक्तालय पुणे,मा मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे, जिल्हा कृषी अधीक्षक पुणे, तसेच विशेष करून बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संंदिपजी मोहिते, उपाध्यक्ष गणेशभाऊ साठे व त्यांच्या संपूर्ण शिष्टमंडळाने बळीराजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवुन शेतकऱ्यांच्या हितासाठी कणखर तीव्र लढा उभा करून दौंड तालुक्यातील शेतकरी यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल या सर्वांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असुन प्रशासनाने केलेल्या कारवाई बाबत समाधान व्यक्त केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील लिंकींगची खते विक्री करणारे इतर खतविक्रेते यांचे चांगलेच धाबे दणाणले असून इतर तालुक्यात कारवाई कधी करणार ही मागणी जोर धरू लागली आहे


Vanchit News