राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी कडून छापेमारी.(आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणात इडी कडून छापे ).गडहिंग्लज आणि कोल्हापूर परिसरात ईडी कडून छापेमारी.
वंचित न्यूज चैनल: सहसंपादक :- श्रीरंग कांबळे. दिनांक:- 11/1/2023. कोल्हापूर:- माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत.कोल्हापूर आणि पुण्यातील दोन घरावर आज सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यातील थकीत शंभर कोटी घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी करत आहे.अद्याप याबाबत मुश्रीफ यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि ईडीने देखील याबाबत सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिलेली नाही. मात्र ही कारवाई झाल्यावर प्रसार माध्यमांना माहिती दिली जाऊ शकते.याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की हे सरकार राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करून कारवाई करत आहे.हिम्मत असेल तर आदानी यांची चौकशी करा यातून देशमुख राऊत बाहेर पडलेत मुश्रीफ हे देखील बाहेर पडतील.हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नलावडे साखर कारखान्यामध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.याबाबतची तक्रार त्यांनी ईडीकडे केली होती त्याच पार्श्वभूमीवर ही छापेमारी होत असल्याची सध्या चर्चा आहे यापूर्वी देखील जुलै 2019 ला देखील याबाबत छापेमारी करण्यात आली होती.गडहिंग्लज बंदची हाक महेश सलवादे यांनी दिली.जिल्ह्याचे दैवत आदरणीय साहेब यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीचा छापा आज पहाटे पडला असून त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज बंद करण्याचा आवाहन करण्यात आले असल्याचे महेश सलवादे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.पोलीस लावून अशा पद्धतीने दहशत माजवून एका चांगल्या काम करणाऱ्या नेत्याच्या घरावर असा मानसिक त्रास देण्याचा उद्देशाने घातलेले हे इडीचे छापे त्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांना उद्योजकांना सर्वांना आम्ही आव्हान करतो की आजच्या दिवशी गडहिंग्लज कडकडीत बंद पाळण्यात यावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडहिंग्लज शहर यांनी केले आहे.