जयसिंगपूरमध्ये कल्पद्रुम आराधना महोत्सवाची जोरदार तयारी अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती.
वंचित न्यूज चॅनल : सहसंपादक:- श्रीरंग कांबळे. दिनांक:- 19/1/2023 जयसिंगपूर : कोल्हापूर जयसिंगपूर शहरातील श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्यावतीने २६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत श्री कल्पद्रुम आराधना महामंडल विधान महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञाचे आयोजन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच या विधानाचे आयोजन होत असून, या महोत्सवाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट जयसिंगपूरचे अध्यक्ष आणि शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. परमपूज्य निर्यापकश्रमण धर्मसागरजी महाराज, परमपूज्य निर्यापकश्रमण विद्यासागरजी महाराज, परमपूज्य निर्यापकश्रमण सिद्धांतसागरजी महाराज व त्यांचा महासंघ व परमपूज्य मुनिजन यांच्या सानिध्यात तसेच प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थानमठ नांदणी यांच्या आज्ञा व अधिनेतृत्वाखाली प. पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य स्वा महास्वामी यांच्या उपस्थितीत विधान ट्रस्ट व सर्व धार्मिक विधी संपन्न होणार काय आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या भगि कल्पद्रुम आराधना महोत्सव व पदा विश्वशांती महायज्ञ समारंभामध्ये आ नित्य पूजा पाठ, धार्मिक विधी, दिव प्रवचन, सरस्वती संस्कार, मौजी उत्स बंधन, गर्भसंस्कारासह धार्मिक व दिगं सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट जयसिंगपूरच्यावतीने या महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण होत आली असून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यामधून श्रावक श्राविका मोठ्या संख्येने या विधान महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. सर्वांच्या स्वागताची तयारी दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे सर्व ट्रस्टी विर सेवा दलाचे कार्यकर्ते, वीर महिला मंडळाच्या भगिनी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून सुरू आहे. नेटक्या नियोजनासह नऊ दिवस चालणारा हा धार्मिक समारंभ उत्साही वातावरणात पार पडेल असेही दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व पूजा समितीचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यांनी शेवटी सांगितले. जयसिंगपूर येथे १००८ दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिरचे ७५ वे वर्ष सांगितले. असून, या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. जयसिंगपूर नगरीच्या इतिहासात प्रथमच श्री कल्पद्रुम आराधना महामंडल विधान व विश्वशांती महायज्ञाचे आयोजन केले आहे. या महोत्सवासाठी भव्य मंडप उभारणीचे काम सुरु आहे. पहिल्या दिवशी नाट्यशुभांगी या नाट्य संस्थेच्या वतीने भरत बाहुबलीचा प्रयोग सादर करण्यात येईल, असे माजी नगरसेवक राजेंद्र झेले यांनी सांगितले. तर दगडी बांधकाम करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणारे हे मंदिर झाले असून, कल्पद्रुम महोत्सवासाठी सर्व समाजबांधवांचे सहकार्य लाभल्याचे दादासो पाटील चिंचवाडकर यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, सुनील पाटील मजलेकर, शरद मगदूम, रमेश इंगळे, प्रकाश निटवे, स्वप्नील इंगळे यासह दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे सर्व सन्माननीय ट्रस्टी, युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.