Vanchit News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या अद्ययावत प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन – आण्णासाहेब चकोते यांची माहिती.



वंचित न्यूज चॅनल : सहसंपादक:- श्रीरंग कांबळे. दिनांक:- 23/1/23. कोल्हापूर/नांदणी चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या आजवरच्या वाटचालीतील सोनेरी पाऊल म्हणजेच नूतन अद्ययावत प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग, भारत सरकार नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी नांदणी येथील स्वाभिमानी फूड क्लस्टर एम.आय. डी.सी.मध्ये होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाम. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून स्थान भूषवतील. आण्णासाहेब चकोते यांनी आतापर्यंत चकोते फूडच्या सर्वच प्रॉडक्टची गुणवत्ता, दर्जा याकडे कायम लक्ष ठेवले आहे. तसेच यामध्ये अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या गुणवत्तेला विशेष महत्त्व दिले आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचायचे असेल तर अधिक चांगली गुणवत्ता आणि नियंत्रणासाठी प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर अनिवार्य असल्याचे अण्णासाहेब चकोते यांना जाणवले आणि या प्रकल्पाची बांधणी झाली. अतिशय प्रतिकूल अशा कोरोना काळात देखील प्रत्येक टप्प्यावर विविध संकटांवर मात करत चकोते ग्रुपने या प्रकल्पाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. सदर प्रकल्प नांदणी येथील स्वाभिमानी फूड पार्क मधील तेरा एकर जागेमध्ये आणि अडीच लाख चौरस फूट सुपर बिल्ट अप एरियामध्ये आकारास आला आहे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान सुरक्षा व स्वच्छतेसाठी लागणारे अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर कमीत कमी मानवी इंटरफेस स्वयंचलित मशीन्सनी युक्त असा हा प्रकल्प आणि या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणारा प्रत्येक पदार्थ गुणवत्तेचा नवा बेंचमार्क सेट करेल असा विश्वास अण्णासाहेब चकोते यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केला. उद्घाटन सोहळ्यासाठी खा.धनंजय महाडीक,खास.धैर्यशील माने, खास. संजय मंडलीक, खास. संजयकाका पाटील, खास. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आम. श्री. हसनसो मुश्रीफ, आम. सतेज उर्फ बंटी पाटील, आम. राजेंद्र पाटील यड्रावकर, आम. विनय कोरे, आम. प्रकाश आवाडे, आम. पी. एन. पाटील, आम. राजूबाबा आवळे, माजी खास. राजू शेट्टी, माजी आम. सुरेश हाळवणकर व एच. के. बत्रा (प्रेसिडेन्ट, एआयबीएमए न्यू दिल्ली), आजी-माजी खासदार आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कंपनीचा स्टाफ, कामगार, व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, मधील सर्व वितरक, रिटेलर्स, मित्र परिवार आणि हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात असून सुमारे पंधरा हजार लोकांची सोय केली जात आहे. कार्यक्रमासाठी येणार्‍या सर्व मंत्री, आमदार, खासदारांसह मान्यवरांसाठी भव्य शामियाना व सर्व सुविधांसह भव्य बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रमुख पाहुण्यांच्या आगमनापर्यंत करमणुकीचे कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केलेले आहे. उपस्थितांना या दिवशी काही नियोजित काळासाठी व्हिजीटर गॅलरी मधून या प्रकल्पाला भेट देता येणार आहे.






Vanchit News