इंदापूर पत्रकार संरक्षण समितीमार्फत सामाजिक कार्यकर्ते अशा सेविका व आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स व पत्रकार यांचा सन्मान सोहळा पडला पार.
वंचित न्यूज चैनल नीरा नरसिंहपुर: दिनांक. २५ उपसंपादक ;सतिश जगताप निरा नरसिंहपुर (तालुका इंदापूर) येथे पत्रकार संरक्षण समिती तालुका इंदापूर यांच्यामार्फत आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमांमध्ये समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 200 मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये इंदापूर तालुका व महाराष्ट्र मधून आलेल्या दीडशेहून अधिक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे संजय निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर बाबा मिसाळ,बहुजन ब्रिगेड महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप मोहिते, ह्यूमन राईट संघटन दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे, क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ भोसले, हायकोर्ट वकील संतोष शिंदे, यांचे सत्कार इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तामामा भरणे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवर्य बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे दत्ता मामा भरणे,जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवर्य बापूसाहेब देहूकर,श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, प्रशांत सीताफ,राधेश बादले पाटील, सचिन बाबर,डॉक्टर कुमार लोंढे, सुधाकर बोराटे, शिवाजी पवार, गणेश कांबळे, पल्लवी चांदगुडे, स्वाती सिद्धार्थ सरवदे, ह.भ.प महेश सुतार महाराज, आणि इंदापूर, माळशिरस, माढा, पंढरपूर बारामती , हवेली, दौंड,तालुक्यातील पत्रकार बंधू उपस्थित होते. सन्मान सोहळ्याला पत्रकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे, रवींद्र खुडे, अरविंद वाघ उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका यांनी घेतलेला कार्यक्रम हा अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा असल्यामुळे समाजातील प्रत्येक स्तरातून या क्रमांकाचे कौतुक होत आहे. पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब सुतार यांना सर्वांकडून शुभेच्छा मिळत आहेत आणि त्यांनी एवढा भव्य आणि दिव्य कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचेही खूप खूप कौतुक होत आहे. समाजासाठी आणि समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी व पत्रकार बांधवांसाठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सन्मानित केल्याबद्दल सर्व स्तरांमधून पत्रकार संरक्षण समिती इंदापूर यांचे कौतुक होत आहे. समाजामध्ये असे उपक्रम घेतल्याने जे जे लोक चांगले सामाजिक कार्य करतात त्यांना आणखीन जास्त काम करण्यासाठी स्फूर्ती मिळते हे या कार्यक्रमातून आढळून आले. शेवटी सर्वांचे भोजन झाले आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.