प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी राज्य मंत्री दत्ता मामा भरणे यांनी वाचला संविधान निर्मितीचा धडा.
वंचित न्यूजचे चैनल: दि.२६/०१/२०२३. उप संपादक: सतीश जगताप आज 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त अंथुर्णे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथील शाळेमध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले तसेच ध्वजारोहण झाल्यानंतर स्काऊट गाईड आणि एनएसएस कॅम्प च्या मुला मुलींनी लॉन्ग मार्च केले यावेळी अंथुर्णे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच अंथरणे भरणेवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी पासून भारतीय संविधान अमलात आणले जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची स्वातंत्र्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. भारताला ब्रिटिश राजवटी पासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले यामागे भारताचा स्वातंत्र्यलढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग होता तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर कलमावर आधारित होते 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली गेली या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे चार नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला केला आणि दोन वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला बरेचसे विचार विमर्शाने सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती हिंदी आणि इंग्रजी 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या आणि दोन दिवसानंतर म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान म्हणून संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून सुवर्ण दिवस साजरा करण्यात येऊ लागला अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.