Vanchit News

मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तांच्या मध्यस्थीने सपकळवाडीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची दिलजमाई...



वंचित न्यूज चैनल : उपसंपादकास :सतिश जगताप. दि.०४/०२/२०२३. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अगदी तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत दांडगा जनसंपर्क आहे.प्रसिध्दीपासून चार हात लांब राहत ते सदैव समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वैयक्तीक संपर्कात राहून अडी-अडचणी सोडविण्याचे काम करतात,हे त्यांच्या कामकाजाचे वेगळेपण आहे.तळागाळात सतत संपर्कात असल्याने त्यांना गावा-गावातील बारिक-सारिक खच-खोड्या तसेच खडान्-खडा माहिती अगदी तोंडपाठ आहे. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद प्रचंड मोठी आहे.अनेक मातब्बर नेते पक्षाकडे असताना सुध्दा केवळ गावाअंतर्गत कार्यकर्त्यांच्या गटा-तटाच्या राजकारणामुळे पक्षाचे अतोनात नुकसान होत आहे.याचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला बसत आहे.(याचे उदाहरण द्यायचे झाल्यास रेडणी गावचे देता येईल,नुकतीच रेडणी गावची ग्रामपंचायत निवडणूक पार पडली,यामध्ये राष्ट्रवादीचे तीन गट एकमेकांविरोधात लढल्याने पक्षाची ताकद असूनही मत विभाजन झाल्याने फक्त 900 मते घेऊन भाजप उमेदवार सरपंच पदी निवडून आला,तर राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांची एकूण मतांची बेरीज तब्बल 2 हजार होत आहे.) त्यामुळे मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आतापासूनच सक्रिय झाले असुन त्यांनी प्रत्येक गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामधील मतभेद मिटवून मनोमिलन करण्यास सुरवात केली असून याची साखरपेरणी सर्वप्रथम सुरवात सपकळवाडी गावामध्ये झाली आहे.या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य सचिन सपकळ व मार्केट कमिटीचे मा.संचालक भाऊसाहेब सपकळ यांच्या गटात प्रत्येक निवडणूकीमध्ये एकमेकांविरोधात टोकाचा संघर्ष पहायला मिळायचा,यादरम्यान पक्षाच्याच दोन गटातील होणाऱ्या राजकारणामुळे पक्षातील वातावरण गढूळ होत असायचे,मात्र गावकी-भावकीच्या राजकारणात नेते मंडळी पडत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर नेहमीच दरी वाढलेली पहायला मिळायची‌. परंतु महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परस्थिती बघता पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची वज्रमूठ बांधणे गरजेचे असल्याने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आतापासूनच ॲक्शन मोडवर आले असुन त्यांनी कालच सपकळवाडीत दोन्ही गटाचे मनोमिलन घडवून आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत सपकळवाडीतील कार्यकर्त्यांनी गावातील सर्व मतभेद संपवून यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एकदिलाने काम करण्याचे श्री.भरणे यांच्या समक्ष जाहीर केले आहे.यावेळी सचिन सपकळ, भाऊसाहेब सपकळ,शिवाजी नथु सपकळ,शिवाजी जगन्नाथ सपकळ,शिवाजी गुंडिबा सपकळ,शिवाजी सोपान सपकळ,सुनिल भुजबळ,तानाजी सोनवणे,जगदीश सपकळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या विषयी बोलताना सचिन सपकळ म्हणाले की, माजी उमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे व माजी राज्यमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्त्यांनी एकत्र येत गावगाड्यातील सर्व मतभेद मिटवले आहेत.अशाच प्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील गटा-तटाचे राजकारण तसेच पक्षांतर्गत मतभेद संपवून,सर्वांची एकत्र वज्रमूठ बांधण्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळी प्रत्येक गावात जाऊन मोर्चेबांधणी करणार आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत होणार असल्याचे सपकळ यांनी सांगितले.






Vanchit News