मुस्लिम बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार,-आमदार दत्तात्रय भरणे.
वंचित न्युज: उपसंपादक :सतिश जगताप. रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी लुमेवाडी तालुका इंदापूर येथील सुमारे 4 कोटी 50 लाख निधीच्या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी अंतर्गत रस्ते सभा मंडप अंतर्गत गटर लाईन तसेच जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या दोन कोटी चाळीस लाख निधीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते आमदार दत्तात्रय म्हणाले की इंदापूर तालुक्यातील हिंदू मुस्लिम भाई भाई असल्याचे पहिल्यापासून इंदापूर तालुक्यातील पाहिले आहे तसेच ते टिकवले पण आहे परंतु सध्याच्या काळामध्ये काही धर्म विरोधी राजकीय पक्ष चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालून धर्म धर्मामध्ये वितूष्ट आणण्याचे काम चोरीछुपे करत आहेत या मंडळींना वेळी त्यांची जागा दाखवत खड्यासारखे बाजूला काढावे असे आवाहन यावेळी भरणे यांनी केले तालुक्यामध्ये विकासाची काम तर होत राहतील परंतु सामाजिक सलोखा राखण्याचे काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच केले आहे तालुक्यामध्ये रस्ते असतील जलजीवन मिशन ची कामे असतील नदीचे बंधारे असतील पूल असतील जलसंधारणाची कामे असतील सामाजिक न्याय विभागाची कामे असतील तसेच अल्पसंख्यांक वस्तीमध्ये बऱ्याच वर्षापासून रखडलेली कामे असतील या सर्व कामांना निधी देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आले आहे आणि यापुढेही काळात लागेल तो निधी देण्याचे ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली लुमेवाडी येथील प्रसिद्ध असलेल्या हाजी हाफिस फत्ते मोहम्मद जोधपुर वाले बाबा दर्गा येथे जाऊन पवित्र समाधीचे चादर चढवून दर्शन घेतले तसेच यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी मनोगत व्यक्त केले श्रीमंत ढोले म्हणाले की आम्ही निरा भिमा कारखान्याच्या जवळ राहतो आम्हाला प्रत्येक गोष्टीची काही चुकीचं घडलं की लगेच कळतं काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात शेतकरी असं म्हणत होता की आमच्या उसाचं वजनाचा काटा चोरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला त्यामध्ये पेमेंट पण अजून झालेले नाही अशा पद्धतीचा कारभार निराभिमासहकारी कारखान्याचे पदाधिकारी करत असतील तर शेतकऱ्यांनी कोणाच्या दारात द्यायचे त्यामुळे इथून पुढे सर्व शेतकरी बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे खंबीरपणे उभा राहून साथ द्यावी आम्ही कुठलाही कोणाचाही कसलाही ऊस शिल्लक राहू देणार नाही याची खात्री देण्याचे काम श्रीमंत ढोले यांनी केले यावेळी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे दत्तात्रय घोगरे सचिन सपकाळ नवनाथ रुपनवर श्रीकांत बोडके तसेच लुुमेवाडी गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.