Vanchit News

इंदापूर तालुक्यातील टणू या गावांमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने भीतीचे वातावरणइंदापूर तालुक्यातील टणू या गावांमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने भीतीचे वातावरण वंचित न्यूज चैनल उपसंपादक:सतिश जगताप दि.१४/०२/२०२३ इंदापूर तालुक्यातील टणु या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने इंदापूर तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्षक पोलीस निरीक्षक पवार या विषयावर बोलले असता ,सदर वस्तू बॉम्ब आहे किंवा अन्य काही या विषयाचा उलगडा बॉम्बशोधक पथकाकडून आलेल्या रिपोर्टनुसारच समजेल. टणू पासूनचे हरहर महादेव या ठिकाणीं असणाऱ्या मोहिते वस्ती मध्ये सदर वस्ती सापडली असून श्री.दत्तात्रेय तुळशीराम मोहिते यांच्या गाईंच्या गोठ्यामध्ये सदर वस्तू सापल्याचे मालकाने सांगितले यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पी.आय. पवार साहेब, व तहसीलदार श्रीकांत पाटील ,व बावडा पोलीस स्टेशनचे ए ,पी,आय नागनाथ पाटील यांना दूरध्वनी वरून सदर माहिती सांगितली रात्री उशिरा पर्यंत सदर गोष्टीचा छडा लावण्यात पोलिसांना अंधार पडल्यामुळे अपयश आले. सकाळी नंतर या ठिकाणी बॉम्बशोधक पथक रवाना होणार असून, सदर गोष्टीचा छडा सकाळीच लागेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


Vanchit News