छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांनी वाचावा-आमदार दत्तात्रय भरणे.
वंचित न्यूज चॅनेल : उप संपादक: सतिश जगताप. इंदापूर:- युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण उत्साहाने साजरी करतो. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची अनमोल वैशिष्ट्ये जाणून घेतली पाहिजे , ज्यामुळे खऱ्या अर्थाने रयतेचा राजा नव्या पिढीला समजेल... छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा युवकांनी जरूर घ्यावा .महाराजांचे संघटन कौशल्य,सामाजिक सलोखा ,दूरदृष्टी अशा अनेक पैलू महाराजांचे घेण्यासारखे होते असे आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले यावेळी जयंती निमित्त विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .