Vanchit News

जुन्नर पोलीस ठाणे विरुद्ध होणार वंचितचा एल्गार..!! - प्रदीप गौतम साळवे.



वंचित न्यूज चॅनेल: संपादक:सचिन बाबर. पुणे- दि.१३/७/२०२४. जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरांमध्ये जुन्नर गावचे भूमिपुत्र प्रशांत जिवाजी सोनवणे, यांचे तक्रार अर्ज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार यांना प्राप्त झाल्यास सुरेशजी मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या आदेशानुसार, १९९४ सालापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या समितीच्या लागत पानबिडी शॉप चे पान टपरी वर सोनवणे कुटुंब आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करत आहे, व पानबिडी शॉप चे भाडं हे पीडब्ल्यूडी च्या अंतर्गत असताना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती यांना भरत होते, लाईट बिल हा पुरावा देखील आहे, जागा पीडब्ल्यूडी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असल्याने २०१४ या सली राजगुरुनगर (खेड) न्यायालय मध्ये याचिका दाखल करण्यात आली, case type : Regular Civil Suit , filling no : 3200622/2014, Register no : 3200187/2014, CNR no : MHPU22-00552-2014 अंतर्गत न्यायप्रविष्ठ बाब असताना व न्यायालयामध्ये संघर्षा चालू असतानाही सोनवणे यांचे पान बिडी शो तोडण्यात आले आहे. सोनवणे कुटुंब हे पान पानबिडी शॉप च्या आधारावर कुटुंबाचं उदरनिर्वाह करत असताना, दिनांक १०/०७/२०२४ रोजी, न्यायप्रविष्ट बाब असून असे माहिती असताना देखील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या भारतीय संविधान च्या माध्यमातून कायद्याचं व शांततेचा भंग करून लोकशाही विरुद्ध हुकुमशाही पद्धतीने गोरगरीब जनतेवर दडपशाही प्रमाणे दुकान हटवण्यात आले आहे.तक्रारदार प्रशांत भिवाजी सोनवणे यांची माहिती अनुसार पानबिडी शॉप हटवण्यासाठी कोणत्याही शासकीय ऑर्डर व कोणतीही माहिती न देता कायद्याचे उल्लंघन करून संपूर्ण पानबिडी शॉप तोडून संपूर्ण मालाचे नुकसान होऊन पानबिडी शॉप गुंडशाही प्रवृत्तीने पान टपरी तोडून गुंडशाही प्रवृत्तीने कोणत्याही अधिकार नसताना ताब्यात घेणारे संजय शिवाजीराव काळे, रुपेश सुभाष कवडे, व त्यांचे सहकारी असून यांच्या मागे कोण मास्टर माइंड आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व पाणबिडी शॉप चे नुकसान भरपाई च्या माध्यमातून पाणबिडी शॉप परत उभारण्यात यावे, पानबिडी शॉप हटवण्यासाठी कोणत्याही प्रकारे शासकीय ऑर्डर नसताना पोलीस बंदोबस्त आदेश देणारे पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं. अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन च्या वतीने जुन्नर पोलीस ठाणे विरुद्ध इच्छा नसताना देखील जनतेला न्याय देण्यासाठी दिनांक ३१/०७/२०२४ रोजी आंदोलन करण्यात येईल. आशा करतो आपण लवकरात लवकर सखोल चौकशी करून गुन्हेगारांना अटक करून गोरगरीब जनतेला न्याय द्याल. असे पत्र द्वारा मागणी वंचित बहुजन आघाडी कामगार जुन्नर तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार यांनी जुन्नर डी वाय एस पी कार्यालय चे अधिकारी राजेंद्र चौधरी साहेब व जुन्नर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांना निवेदन देण्यात आले. सोबत जावेद भाई मोमीन (पुणे जिल्हा निरीक्षक), मारुती खरात पाटील,पंकज भाऊराव सरोदे (आंबेगाव तालुका अध्यक्ष), अविनाश भाऊ रोकडे (आंबेगाव तालुका सचिव),नफीस भाई शेख (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष), मंगेश भाऊ राठोड (घोडेगाव शहराध्यक्ष), आकाश शिंदे (घोडेगाव शहर सचिव), ऍड. रंजीत यादव (आंबेगाव तालुका सचिव), संकेत भाऊ अस्वार (ओतूर शाखा अध्यक्ष), अर्चनाताई (कशी केदार जुन्नर तालुका उपध्यक्षा), सुरैया ताई शेख (जुन्नर तालुका संघटक), गणेश भाऊ आस्वार (जुन्नर तालुका सचिव) अरुण दादा सोनवणे, मेहबूबा कुरेशी, नितीन भाऊ काशी केदार, सीताताई मोरे, संगीता ताई मिर्के, संतोष रोकडे, अमित रोकडे, बाळासाहेब वाघ, सुरेश दादा रोकडे, उत्तम भाऊ वाघमारे, आशुतोष मोरे, ज्ञानेश्वर गाडेकर,प्रशांत भिवाजी सोनवणे यांचे परिवार उपस्थित होते.






Vanchit News