शेतकरी आता चक्क गॅस पिकवणार...

कराड तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या हत्ती गवतापासून म्हणजेच नेपियर ग्रास पासून बायो सीएनजी व बायोकोल उभारणार प्रकल्प यासाठीचे ऑफिस ओपनिंग कराड तालुक्यामध्ये 88 बुधवार पेठ, मोहोळकर हॉस्पिटल शेजारी तालुका कराड जि . सातारा. दिनांक 05 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता. झाले. ऑफिसचे ओपनिंग प्रसंगी आनंद ऐग्रो फार्मर प्रोडुसर चे संचालक तथा MCL चे BDA माननीय प्रा. चंद्रशेखर कापशीकर यांनी माहीती दिली आहे. चला तर मग शेतकरी आता अन्नदाता बरोबर ऊर्जादाता होणार.कंपनीच्या मार्फत रोज 100 टन हत्ती गवतापासून बायोकोल निर्मिती होऊ शकेल इतका मोठा *बायोकोल प्रकल्प कराड तालुक्यामध्ये उभारण्यात येणार आहे* तसेच या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे तसेच या प्रकल्पात मध्ये स्थानिकांना नोकरीची संधी भेटणार आहे तालुक्यामध्ये सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहिती घेण्यासाठी आपण ही या ऑफिस ला भेट द्या. ऑफीसचे उद्घाटन बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश महासचिव सामाजिक कार्यकर्ते किरणजी आल्हाट साहेब यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी कराड तालुका MPO आनंद थोरवडेंना यांना शुभेच्छा देण्यासाठी 800 पेक्षा जास्त शेतकरी व मित्र परीवार उपस्थीत होता. तसेच कार्यक्रमासाठी एमसीएल बायो फिल्म लिमिटेडचे सीनियर नॅशनल प्राईम बी डी ए श्रावण माने, राजर्षी राज चे सीईओ किरण घुगरे , सातारा एम पी ओ रामचंद्र जाधव, माण तालुक्याचे एम पी ओ कदम साहेब, डॉक्टर मोहोळकर , डॉक्टर पतंगे सर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेतकर्यांना काय मिळणार ?कंपनीमध्ये आतापर्यंत तीन हजार सभासद झाले आहेत. कंपनीचे उद्दिष्ट पंधरा हजार शेतकऱ्यांना सभासद करून घेणे आहे. त्यासाठी प्रत्येकी 110 रुपये भरून घेतले जात आहे. गवतासाठी शेतकऱ्याला काहीच इतर खर्च येत नाही. कंपनी एक हजार रुपये प्रति टन या दराने हत्ती गवत खरी करणार आहे. तालुक्यामध्ये या प्रकल्पामुळे स्थानिकांना संधी दिली जाणार आहे. जवळपास प्रत्यक्ष 2000 लोकांना रोजगार भेटणार आहे. संपर्क : 9595953972.