कोल्हापूरमध्ये भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात गुन्हा झाला आहे.
वंचित न्युज चैनल : सह संपादक :- एस एम कांबळे तारीख :- 12/11/24 कोल्हापूर धनंजय महाडिकांनी लाडकी बहीण योजनेवरून कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत केलेलं विधान चर्चेत आहे. विरोधकांनी या विधानावर आक्षेप घेतलाय कोल्हापूरात महायुतीच्या सभेतील एका विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धनंजय महाडिक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.