
रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी :- संदेश संसारे ( नाना ) तारीख:- 24/6/23 रत्नागिरी:- आज दिनांक 24 जून रोजी सर्वत्र मानसून पूर्व पावसाचे आगमन झाले असता शेतकरी वर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण झाले तसेच पहिल्याच सुरू झालेल्या पावसाने रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटामध्ये दरड कोसळून घाटामध्ये असणाऱ्या गायमुख गणेश मंदिराचे पूर्णतः नुकसान झाले आहे तरी या मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची वर्दळ असते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.