Vanchit News

सोनके तलावात लवकरात लवकर पाणी सोडावे अन्यथा आंदोलन करणार-चेअरमन अभिजीत पाटील.वंचित न्यूज चॅनेल: पंढरपूर शहर प्रतिनिधी: श्री.सोमनाथ ठिगळे. सोनके तलाव लवकरात लवकर भरून घ्यावा यासाठी मा.जलसंपदा विभाग पंढरपूर येथील अधिकारी यांना राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित निवेदन दिले. माझा बळीराजा शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या शेतात सोनं पिकवतो आणि पाण्यावाचून पिकं डोळ्यासमोर जळून जातात.त्यामुळे निरा भाटघर कालव्यातून सोनके तलाव भरुन मिळावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल,शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते रणजीत बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक नेते सचिन आटकळे, पिराजी कुरोली चे माजी सरपंच कुलदीप कोलगे, समर्थ साठे यांसह आदी उपस्थित होते.


Vanchit News