Vanchit News

*इंदापूर तालुक्यातील टनु गावात आठवडी बाजाराची सूरुवात"*वंचीत न्यूज चैनल सह् सम्पादक :सतीश जगताप दि.०६/०२/२०२४ इंदापूर तालुक्यातील टनु या गावांमध्ये मंगळवार या दिवशी आठवडी बाजाराची सुरुवात झालेली असून हा दुसरा आठवडी बाजार आहे या बाजारामध्ये कपडे विक्रेते पालेभाज्या विक्रेते किराणा दुकाने खाऊचे स्टॉल अशाप्रकारे चांगल्या प्रमाणात खरेदी विक्री व्यवहार बाजारात होऊ लागला असून टनु गाव चे सरपंच प्रतिनिधी तेजेशमोहीते, यांनी सांगितले की हा आठवडी बाजार असाच चालू ठेवायचा असेल तर परिसरामध्ये इतर ठिकाणी असलेल्या बाजारामध्ये न जाता आपल्या गावातीलच बाजारामध्ये खरेदी विक्री करावी त्यामुळे आपल्या गावातील बाजार चांगल्या प्रकारे चालू राहील. बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच राजेंद्र मोहिते, माजी सरपंच प्रतिनिधी सागर मोहिते, नूतन सरपंच प्रतिनिधी तेजस मोहिते, सयाजी मोहिते ,अमोल जगताप, नाना पाटील लहू जाधव ,बापू जाधव, दिलीप मोहिते व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. सदर बाजार टनूमध्ये भरवण्यासाठी वि शेष सहकार्य हर्षल लावंड यांनी केले आहे त्यामुळे त्याचेही गावकऱ्यांनी आभार मानले


Vanchit News