Vanchit News

लक्ष्मी नरसिंहाच्या त्रिवेणी संगमावर कैलासवासी गिरीजाबाई भरणे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पाडला .



वंचित न्यूज चॅनेल : निरा नरसिंहपुर दिनांक :3 जुलै 2022. पुणे जिल्हाप्रतिनिधी:-सतीश जगताप. नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे लक्ष्मी नरसिंहाच्या त्रिवेणी संगमावर आज दिनांक, 3 रोजी कैलासवासी गिरीजाबाई भरणे यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम करण्यात आला. लक्ष्मी नरसिंहाचे पुजारी आनंद काकडे, कमलेश डींगरे, यांच्या हस्ते दशक्रिया विधी करण्यात आली. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कुटुंबांचे प्रेम संपूर्ण तालुक्यावर आसल्यामुळे या भागातील हजारोच्या संख्येने ग्रामस्थ दशक्रिया विधीसाठी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशा थोर माता माऊलीच्या निधनामुळे इंदापूर तालुक्यावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. गिरीजाबाई भरणे यांच्या दशक्रिया विधीसाठी आनेक जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेले शासकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका आध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाअध्यक्ष सागरबाबा मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, नरहरी काळे, श्रीकांत बोडके, रंजीत वाघमोडे, पांडुरंग डिसले, दादासाहेब शिरसागर, चंद्रकांत सरवदे, श्रीकांत दंडवते, पांडुदादा बोडके, जगदीश सुतार, आरुण शिरसागर, संतोष सुतार, दशरद राऊत, रमेश मगर, सुदर्शन बोडके, दत्ता कोळी, हे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने गिरजाबाई भरणे यांच्या दशक्रिया विधीसाठी उपस्थित होते. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे अल्पशा आजाराने दिनांक 1 जूलै रोजी पहाटे दु:खद निधन झाले. दुपारी ठिक 2 वाजता त्यांच्यावर भरणेवाडी तालुका इंदापूर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दिनांक, 3 रोजी भरणेवाडी येथे सकाळी 7 वाजता माती लोटण्याची विधी झाल्यानंतर लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीमध्ये येथे सकाळी 10 वाजता दससक्रिय विधी करण्यात आली.






Vanchit News