Vanchit News

संत श्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी या ठिकाणी.



वंचित न्यूज चॅनेल : निरा नरसिंहपुर. दिनांक:4 जुलै 2022. पुणे जिल्हा प्रतिनिधी : सतिश जगताप. सराटी तालुका इंदापूर येथे पुणे जिल्ह्यातील शेवटी मुक्कामा ठिकाणी संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल होऊन सराटी गावच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हानुमंत कोकाटे, सराटी ग्रामपंचायत सरपंच बापूसाहेब कोकाटे, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, महेश जगदाळे, पैलवान रोहित जगदाळे, पैलवान आमर जगदाळे, वकील राजेंद्र जगदाळे, भैय्या कोकाटे, मनोज जगदाळे, बाबासाहेब कोकाटे, या सर्वांच्या उपस्थितीत सराटी येथील पावन भूमीमध्ये संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी आगमन झाल्यानंतर टाळ आणि मृदंगाच्या आवाजात नामाचा गजर व जयघोष करीत सराटी नगरीमध्ये पालखी दाखल होऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. पालखी सोहळ्यासाठी आलेले सर्व भाविक भक्त व वारकरी दिंडी सोहळा प्रमुख देहू संस्थान अध्यक्ष ह भ प नितीन गोपाळ मोरे, विश्वस्त भानुदास अंकुश मोरे, संतोष नारायण मोरे, माणिक गोविंद मोरे, संजय दामोदर मोरे, अजित लक्ष्मण मोरे, देहू संस्थान पालखीच्या बरोबर आलेले सर्वच विश्वस्त व वारकऱ्यांचे तसेच शासकीय अधिकाऱ्यांची गावच्या वतीने स्वागत करून अन्नदान व भोजनाची व्यवस्था सराटी गावच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी स्वच्छ, अन्नदान, सार्वजनिक शौचालय, राहण्यासाठी स्वच्छ, जागा उपलब्ध आशा अनेक प्रकारे सुख आणि सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. पालखी सोहळ्यासाठी आलेल्या भाविक भक्तांची कोणतीही अडचण येऊ देणार नाही आसे सराटी येथील जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुका आध्यक्ष हानुमंत कोकाटे, सरपंच बापूसाहेब कोकाटे, यावेळी बोलत होते.






Vanchit News